संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - देव लटिका तो ऐसा । स...

देव लटिका तो ऐसा । संदेहसा वाटतो ॥१॥

ऐसें आलें अनुभवा । मज सेवा करितां ॥२॥

बहु शून्याकारी मोळा । भेहें डोळा पवाडे ॥३॥

तुका म्हणे ताळ नाहीं । एके ठायीं चपळ ॥४॥