झालों उतराई । चित्त ठेउनियां पायीं ॥१॥
परी खोटा केशीराजा । अंत न कळेचि तुझा ॥२॥
आम्ही सर्वस्वें उदार । तुज देउनियां धीर ॥३॥
इंद्रियांची होळी । दिला संवसार बळी ॥४॥
न पडे विसर । तुझा आम्हा निरंतर ॥५॥
प्रेम एका साठीं । तुका म्हणे तीच गांठी ॥६॥