कैसा तूं निष्ठुर होउनी राहसी । ऐसें तुजपाशीं काय बळ ॥१॥
थकुनियां सर्व मान अपमान । माझें मन ध्यान पायांपाशीं ॥२॥
सदा सर्वकाळ संतोष चित्तासी । ऐसें हृषीकेशी दावीं भज ॥३॥
तुका म्हणे काय तुम्हापाशीं उणें । मज भक्ति देणें जन्मोजन्मीं ॥४॥