जन्ममृत्यु हे तों आमुची मिरासी । हे तूं निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राहें करीं खरा खोटा वाद । आम्ही झालों निंद्य लंडीपणें ॥२॥
उभयतां आहे करणें समान । तुम्हा ऐसें म्हणे मीही देवा ॥३॥
तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाचीं भ्रम फेडीं आतां ॥४॥