संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - आम्हा नेणो कोणी नाहीं तुज...

आम्हा नेणो कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥

हा गे माझ्या भोगें केला या परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥२॥

आम्ही तुज असों देउनी आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥३॥

तुका म्हणे मज धरियेलें बळें । पंचभूत खेळें करोनियां ॥४॥