संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - उभा होतों महाद्वारीं । मू...

उभा होतों महाद्वारीं । मूर्तिं देखिली साजिरी ॥१॥

पाहतां पाहणें निमालें । रुपीं तद्रूप मन झालें ॥२॥

तुका म्हणे बोलों काई । कैंचा विठ्ठल कैंची राही ॥३॥