संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - तुझ्या नामाचें कीर्तन । ह...

तुझ्या नामाचें कीर्तन । हेंचि आमुचें संध्यास्नान ॥१॥

तुझ्या चरणाचें चिंतन । हेंचि आमुचें अनुष्ठान ॥२॥

तुझ्या प्रेमें लाऊं निद्रा । हेचि आमुची ध्यान मुद्रा ॥३॥

तुका म्हणे सारे । ब्रह्मरुप हे पसारे ॥४॥