संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - तुकोबाची भाज सांगतसे लोका...

तुकोबाची भाज सांगतसे लोकां । जाला हरीदास स्वामी माझा ॥१॥

फुटकासा वीणा तुटक्याशा तारा । करी येरझारा पंढरीच्या ॥२॥

त्याचे वेळे सटवी कोठें गेली होती । ऐसा कां संचितीं नेमियेला ॥३॥

ऐसियाचा राग येतो माझ्या पोटीं । बाळें तीन घोटीं निंब जैसा ॥४॥

विठोबाच्या नामाचा काला भंडवडा । रचिला पवाडा तुका म्हणे ॥५॥