संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - ऐसा कैसा तूं हो धीट । माग...

ऐसा कैसा तूं हो धीट । मागें भिरकाविली वीट ॥१॥

कां हो पुंडया मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥२॥

युगें जालीं अठ्ठावीस । अजुनि कां रे म्हण बैस ॥३॥

तुका म्हणे पुंडलीका । तूंचि भक्त एक निका ॥४॥