संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - मातेचें हृदय कृपाळु बहुत ...

मातेचें हृदय कृपाळु बहुत । बापाहुनि चित्त कळवळी ॥१॥

तूंही कैसी तयासारिखी जालीस । कवणाची आस करुं सांग ॥२॥

सांगें रखुमाई विठ्ठरायासी । म्हणे भेट त्यासी जाउनियां ॥३॥

तुका म्हणे नका नेउं मज माहेरा । येतां माझे घरा काय वेंचे ॥४॥