यावें नारायणा व्हावें कृपावंत । आतां माझा अंत पाहूं नये ॥१॥
वाटतें अंतरीं पहावे चरण । द्यावें आलिंगन नारायणा ॥२॥
माझें समाधान दुजें कोण करी । आहे सर्वांपरी चिंता तुम्हा ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पोटासी मी आलों । नेणोनि चुकलों पाय तुझे ॥४॥