आम्ही तुझे शरणागत । जन्मोजन्मींचे अंकित ॥१॥
तुज वांचुनियां देवा । नेणों आणिकांची सेवा ॥२॥
तुझ्या नामाचें पूजन । हेंचि आम्हा अनुष्ठान ॥३॥
रामनामाचें भूषण । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥४॥