कोठें गुंतलासी पंढरीच्या राया । वेळ कां सखया लाविलासी ॥१॥
नाहीं धीर आतां येईं लवकरी । गरुडावरी हरि बैसोनियां ॥२॥
दीनबंधु ब्रीद सांभाळीं आपुलें । नको पाहूं केलें पापपुण्य ॥३॥
तुका म्हणे होसी कृपाळु माउली । बाळकें आपुलीं रक्षीं आतां ॥४॥