संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग...

जासी तरी जाईं संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथ मना ॥१॥

सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणिक ते बोल न बोलती ॥२॥

करिसी तरि करीं संतांची संगति । आणिक हे मति नको मना ॥३॥

बैस तरी बैसें संतांचिया मधीं । आणिक ते बुद्धि नको मना ॥४॥

तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥५॥