संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - दिवाळी दसरा नाहीं आम्हा स...

दिवाळी दसरा नाहीं आम्हा सण । सखे हरिजन भेटतांचि ॥१॥

धन्य तो दिवस जाला सोनियाचा । विकली हे वाचा रामनामें ॥२॥

दुःख तें दरिद्रय गेलें हरपोनी । तटस्थ होऊनि काळ ठेला ॥३॥

तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेवूं पायीं संताचिया ॥४॥