संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - जेणें होय अपकीर्ति । तें ...

जेणें होय अपकीर्ति । तें सर्वार्थीं त्यजावें ॥१॥

सत्य रुचे भलेपण । तें वचन जगासी ॥२॥

परद्रव्य परजाया । पाहुन वायां न भुलावें ॥३॥

तुका म्हणे खोटें वर्म । निंद्य कर्म काळिमा ॥४॥