देवा माझी भक्ति भोळी । एकविधा भावबळी ॥१॥
मी तों पडेन निराळा । ऐसा सांडोनी सोहळा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाये । येथें उगा उभा राहें ॥३॥