विटेवरी मूर्ति आली भीमातीरीं । लाडका तो हरि यशोदेचा ॥१॥
गोकुळांत यानें चोरी केली फार । म्हणोनि समोर उभा केला ॥२॥
विटेवरी उभा कटावरी हात । लज्जेनें पहात लोकांकडे ॥३॥
तुका म्हणे चोर धरिला पुंडलिकें । चला जाऊं कौतुक पहावया ॥४॥