मिळोनियां संतजन । करुं देवाशीं भांडण ॥१॥
वेढा वेढा पंढरपुर । धरा रखुमाईचा वर ॥२॥
लुटा लुटा हो पंढरी । मोर्चा लावा भीमातीरीं ॥३॥
तुका म्हणे हल्ला केला । भार निशाणीं दाटला ॥४॥