आतां राहो हेंचि ध्यान । डोळां म्हणे लंपट ॥१॥
कोंडुन कोंडुन धरिला जीव । जीवें भावें पूजीन ॥२॥
वहिलें येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतर ॥३॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडूं या ॥४॥