संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - सज्जनासी काय क्रोध । दुर्...

सज्जनासी काय क्रोध । दुर्जनासी काय बोध ॥१॥

काय गाढवासी गूळ । काय कोळ्यासी प्रेमळ ॥२॥

काय ज्ञान त्या बोकडा । मोतीं घातलें माकडा ॥३॥

काय खळासी ब्रम्हज्ञान । तुका म्हणे झाला शीण ॥४॥