पोटापुरतें देईं । मागणें लइ नाहीं लइ नाहीं ॥ध्रु०॥
पोळी साजुक अथवा शिळी । देवा देइं भुकेच्या वेळीं ॥१॥
वस्त्र नवं अथवा जुनं । देवा देईं अंग भरुन ॥२॥
देवा कळणा अथवा कोंडा । आम्हां देईं भुकेच्या तोंडा ॥३॥
तुका म्हणे आतां । नका करुं पायांपरता ॥४॥