भजन : भाग १

भजन हे मुळात देव किंवा देवीची स्तुती करण्यासाठी गायिले जाणारे गाणे आहे. साधारणपणे भारतीय पध्दतीत उपासना करताना भजने म्हटली जातात. भजन मंदिरात सुद्धा गायली जातात.


पार्वती तनया श्री गणराया

पार्वती तनया श्री गणराया मंगलदायक विघ्नेशा ॥धृ॥

तुची अससी शिवविष्णु विरंची, तुची सदगुरु विघ्नेशा ॥१॥

शंभु कुमारा विघ्न हारका बुद्धिदायका सुखदाता , मूषक वाहना रिद्धिरमणा । गजवदना हे जगदीशा ॥२॥

भालचंद्र सिंदुदारी गणपति विकट विनायक वरदाता लंबोदर हे म्हणती तुजला अष्टनायका प्राणेशा ॥३॥

एकदंत गजकर्ण सुरेशा शरणागत जे तवचरणा येती, त्यांचे संकट हरती कोड पुरविशी सिद्धिशा ॥४॥