श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य

स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात "श्री आर्यादुर्गा महात्म्य" वर्णन केले आहे.


श्रीआर्यादुर्गाष्टक

आर्यादुर्गे देवी । निज भक्तां शांति सुख सदा देई ॥

इह पर शत्रू शमवुनि । निज सुख दे पाप तें लया नेई ॥१॥

आर्यांच्या विनतीने । प्रगटुनिया देवकार्य कां केलें ।

सर्व जना तोषवुनि । वेतातें सबलही लया नेलें ॥२॥

शिशुदुःखा अवलोकुनि । जननी धावूनि उचलुनि धरिते ।

त्यापरि भक्तां संकटि । आर्यादुर्गा प्रशस्त तें करिते ॥३॥

अरिवर्गा नासुनिया । भक्तां सांभाळण्या सदा धावें ।

देवांनाहि जड असें । कार्य करुनि सज्जना सदा पावे ॥४॥

भक्तांलागी वरदा । कलियुगीं दुसरी नसे असें वदती ।

म्हणवूनि शरण आलो । तव चरणासी असो सदा प्रणती ॥५॥

जे महिषासुर दुर्मद । शुंभ निशुंभादि मातले फार ।

त्यां सर्वांते निपटुनि । केला लोकांत भक्त उद्धार ॥६॥

भू भाराते वारी । दावी भक्तांसि आपुला महिमा ।

ब्रह्मादिक तुज स्तविति । लोकीं विसरुनि आपुली गरिमा ॥७॥

आर्यादुर्गा वरदाष्टक हें । गाईल भक्त जो नित्य ।

त्याचे अनिष्ट जाउनि । ह्रदयीं उगववेल ज्ञान आदित्य ॥८॥