श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय ४

श्रीगणेशायनमः ॥ जयजगदारंभस्तभे ॥ सगुणनिर्गुणरुपस्वयंभे ॥ सर्वचाळकेस्वयंप्रभे ॥ सर्व पाळकेनमोतुज ॥१॥

वरिष्ठऋषिशंकरासी ॥ पुसताजाहला आदरेसी ॥ जगदंबेनेंश्रीरामासी ॥ केव्हां वरदानकायदिलें ॥२॥

कोणतेकाळींयमुनापर्वती ॥ रामासीभेटलीआदिशक्ति ॥ हेंसर्बहीमजप्रती ॥ चरित्रसांगावेंदेवीचें ॥३॥

प्रश्नाऐकोनशंकरम्हणती ॥ ऐकवरिष्टामहामती ॥ ज्याकारणास्तवज्या काळींनिश्चिती ॥ देवीभेटलीश्रीरामा ॥४॥

तेंसंगतोंइत्थभुत ॥ सावधाएकेदेऊनचित्त ॥ जगदंबेची लीलाअदभुत ॥ परमपवित्रतिहीलोकीं ॥५॥

तरीपुर्वीभृगुवंशात ॥ सावधाऐकेदेऊनचित्त ॥ जगदंबेची ऋषिजजमदग्नित्याविख्यात ॥ भार्यारेणुकामहासाधवी ॥६॥

तेउभयताधर्मनिष्ठ ॥ तपोनिष्तज्ञाननिष्ठ ॥ त्यासी पुत्रचारत्यांत कनिष्ठ ॥ षष्ठावतारविष्णुचा ॥७॥

अधार्मिकक्षात्रियझालेफार ॥ भूमीसीझाला त्यांचाभार ॥ तौतरावयाश्रीकरधर ॥ रेणुकाउदरींअवतरला ॥८॥

जामदग्नीभार्गवराम ॥ क्षत्रियारण्यछेदकपरम ॥ परशुरामनामउत्तम ॥ बहुचांगलेंशोभन ॥९॥

तवकोणेएकेकाळीजाण ॥ कार्तवीर्य सहस्त्रार्जुन ॥ मृगयाकरावयालागुन ॥ सेनेसहितनिघाला ॥१०॥

वनीहिंडतांश्रमलाबहुत ॥ सेने सहितक्षुधाकांत ॥ आश्रमासीअकस्मात ॥ जमदग्रिच्यापातला ॥११॥

ऋषीनेंसत्कारकरून ॥ सर्वासी दिधलेंमिष्टान्नभोजन्न ॥ राजाआश्चर्यमानून ॥ विचारअंतरींकरीतसे ॥१२॥

म्हणेहादुर्बळब्राह्मणज ॥ याचेंगांठींकैंचेंधन ॥ एकपर्णशाळबांधुन ॥ अरण्यांतराहतसे ॥१३॥

मीतरीसार्वभौमनृपती ॥ मज नाहीयेवढ़ीशक्ति ॥ येणेंतरीसर्वांप्रती ॥ तृप्तीकेलेअविलंबें ॥१४॥

ऐसाविचारांतरींकरी ॥ मगकळलें कींयाचेघरीं ॥ कामधेनुपुरवीसामग्री ॥ इच्छेप्रमाणेंसर्वदा ॥१५॥

तेव्हांराजाअभिलाषयुक्त ॥ सेवकासीआझाकरित ॥ कामधेनुघेउनत्वरित ॥ चलाआपुल्यानगरासी ॥१६॥

तेव्हांरामनव्हतांआश्रमांत ॥ समिधा आणावयागेलावनांत ॥ इकडेकामधेनुसीनृपनाथ ॥ घेउनगेलानिजनगरा ॥१७॥

जमदग्रिऋषी शांत ॥ उद्विग्रतानसेकिंचित ॥ लाभहानीसमान मानित ॥ स्वस्थबैसताअसनीं ॥१८॥

दर्भसमिधाघेउन भार ॥ रामाअश्रमाआलासत्वर ॥ पित्यापुढेंठे उनझडकर ॥ नमस्कारकरितसे ॥१९॥

हातजोडुनीयां पुसे ॥ म्हणेधेनुकोटेंगेलीनदिसे ॥ ऋषीबोलेराजपुरुषे ॥ नेलीराजाआज्ञेंनें ॥२०॥

ऐकोनीरामकोपलाभारी परशुधनुष्यतेतलेंकरी ॥ बाणभातेपाठीवरी ॥ घेउनझडकरिनिघाला ॥२१॥

राजनगरासी येऊन ॥ नगरद्वारासीरोधून ॥ उभाराहुनबोलेवचन ॥ धेनुद्यालवकरी ॥२२॥

नाहींतरीतुमचेप्राण ॥ घेउनधेनुसीनेईन ॥ ऐकताक्षोमलासहस्त्रार्जुन ॥ सैनीकविरासीबोलत ॥२३॥

कोणाआला आहे ब्राह्मण ॥ बहुबोलतोघिटवचन ॥ तरीत्याचापराभवकरुन ॥ दवडोनदुरघालावा ॥२४॥

राजआज्ञेनें रामासमोर ॥ शस्त्रेंघेउनधावलेवीर ॥ रामकुठारघायेंशुर ॥ सर्वमारुनटाकिले ॥२५॥

मगसहस्त्रार्जुन सत्वर ॥ सवेदहासहस्त्रकुमर ॥ सत्राअक्षौहिनीदळभार ॥ घेउनयुद्धासीपातला ॥२६॥

रामएकटा एकांगवीर ॥ त्यावरीलोटलेंसैन्यसमग्र ॥ एकदांचसर्वहीसोडतीशर ॥ जैसागिरीवरीमेघधारा ॥२७॥

परशुरामप्रतापी अदभुत ॥ बाणेबाणनिवारीत ॥ अतित्वरेंविरासीमारित ॥ अग्निजाळीततृणजैसें ॥२८॥

सैन्यसर्वहीमारिलें ॥ कांहींप्राणघेऊनपळाले ॥ कांहींघायाळहोउनीपड़िलें ॥ समारंगणीलोळात ॥२९॥

रामप्रतापेंअदभुत ॥ कार्तविर्याच्याभुजाछेदित ॥ मस्तकतोडोनीत्वरित ॥ धरणीवरीपाडिलें ॥३०॥

ऐसापराक्रमकरोनी ॥ खळदुर्जनासंव्हारुनी ॥ कामधेनुसीगेलाघेउनी ॥ आश्रमाशीलवलाही ॥३१॥

सहस्त्रार्जुनाचेसुत ॥ पळाळेतेराहिलेजिवंत ॥ दुःखशोकातेकरुनीअत्यंत ॥ झुरणीलागले मगम्हणती ॥३२॥

आमुचापितामारिलाजेणें ॥ त्याचापितावधावायत्नें ॥ सूटौगवावातरीजीणें ॥ सफळाआमूचें होईल ॥३३॥

परीतोरामजवळींअसतां ॥ कार्यनसार्धसर्वथा ॥ दुरजाईलतेव्हांतत्वता ॥ कार्यसाधु आपुलें ॥३४॥

मगगुप्तहेरठेवोनी ॥ पाळतीघेती अनुदिनीं ॥ तवबंधुसहितएकदिनीं ॥ रामगेलाअरण्यांत ॥३५॥

जमदग्रिरेणुकासती ॥ हींदाघेंचघरीं असतीं ॥ संधीपाहुनत्वरितगती ॥ दुर्जनाआश्रमींपताले ॥३६॥

प्रातःकाळींचेंकर्मकरून ॥ ऋषीवैसलाध्यानधरुन ॥ तोंहोमशाळेंतयेऊनदुर्जन ॥ मारावया प्रवर्तले ॥३७॥

सतीधांवोर्ना आडवीजाहली ॥ तिसीहीशस्त्रेंहाणीतलीं ॥ ऋषीसीमारुनीतात्काळीं ॥ रामभयेंपळालें ॥३८॥

रेणुका आक्रोशेंहाकाफोडित ॥ धांवरेधांवरामात्वरित ॥ ऐकोनिरामधांवला त्वरित ॥ मातेजवळींपातला ॥३९॥

एकविसघावलावलेमातेसीं ॥ पितातरीमुकलाप्राणासी ॥ तेणें दुःखेंरामरुदनासी ॥ करितांझाला अत्यंत ॥४०॥

रेणुकातरीमहासती ॥ अवतरली आदिशक्ति ॥ पतिव्रतेचाधर्मानिश्चिती ॥ आचरुनीदावित ॥४१॥

धर्ममार्गीजगलावावें ॥ हेंचिकर्तव्यतिचेंबरबें ॥ मनुष्य नाव्यसंपादावें ॥ लौकिकमार्गजाणॊनी ॥४२॥

मुळींच एकरूप असोन ॥ व्यक्तीपाहतांदिसेदोन ॥ शिवशक्तिनामेंकरून ॥ युगायुगींअवतरे ॥४३॥

रामाचेंकरुनीसमाधान ॥ त्याहातींगतीकरवृन ॥ ब्राह्मणासहविधान ॥ वेदविहितकरविलें ॥४४॥

पतिदेहगर्तेतठेवूनी ॥ प्रतिप्तकरोनियांवन्हीं ॥ त्यांत प्रवेशकरोनी ॥ स्वर्गाजातसेभर्तृका ॥४५॥

पुढेंआत्मेष्ठिचेंकर्म ॥ सांगताजाहलाश्रीदत्तपरम ॥ कर्तव्य तेंकरोनीउत्तम ॥ कृतार्थपरशुरामजाहला ॥४६॥

परशुरामजोडूनीहात ॥ मातेचीप्रार्थनाकरित ॥ माते दर्शनदेईत्वरित ॥ माझेंसंनिधतूंराहे ॥४७॥

तुजवांचोनीमजक्षणभरीं ॥ सुखनहोयनिर्धारीं ॥ धावपाव आतांलवकारीं ॥ समाधानकरीमाझें ॥४८॥

स्वामीस्कंदऋषीगनाप्रती ॥ म्हणीकाएकाग्रचित्तीं ॥ भार्गवेंप्राथिलीभगवती ॥ तीतेव्हांप्रगटझाली ॥४९॥

येथेंप्राकृतमंदगती ॥ विनवीतसेश्रोतीयाप्रती ॥ मूळग्रंथाचेंतात्पर्यमजप्रती ॥ उमजलेंतेंबोलतोंमी ॥५०॥

मूळश्लोक ॥ स्कंदउवाच ॥ इतीश्रुत्वावचस्तस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ॥ प्रादुरभुतावभौदेवीरामवचनमब्रवीत ॥

टीका ॥ अक्लिष्टकर्माभार्गवराम ॥ त्याची प्रार्थनाऐकुनीउत्तम ॥ देवीधरोनीरुपनाम ॥ बोललीभार्गवरामासी ॥५१॥

अक्लिष्टम्हणजेक्लेशरहित ॥ ईश्वरहोयतोनिश्चित ॥ पंचविधक्लेशयुक्त ॥ तोजाणिजेजीवात्मा ॥५२॥

अविद्याअस्मितारागद्वेष ॥ पांचवातोअभिनिवेश ॥ यासर्वासम्हणावेंक्लेश ॥ यासीप्रमाणयोगशास्त्री ॥५३॥

देहासीआत्माम्हणणें ॥ हेंअविद्येचेंरुपजाणणें ॥ देहच आत्मानविसणें ॥ अस्मितायासीम्हणावें ॥५४॥

देहासीअनुकुलप्रिय तोराग ॥ प्रतिकुळअप्रियतोद्वेष ॥ अभंग ॥ अभिनिवेशतोयथासांग ॥ सांगतोंतेंऐकावें ॥५५॥

हा देहचाआपणस्वभावें ॥ याचेंनामरुपवाढवावें ॥ घनविद्यादिकसंपादावें ॥ महत्वयावेंदेहासी ॥५६॥

याचीएकिर्तींव्हावीफार ॥ नकरोनीधर्माधर्माविचार ॥ विषयसुखार्थव्यापार ॥ करणेंतोचअभिनिवेश ॥५७॥

ऐसेंपंचविधक्लेशयुक्त ॥ निवासीघडसुकृतदुष्कृत ॥ तेणेंनानयोनीजन्मत ॥ दुःखभोगेतनकादि ॥५८॥

ईश्वरपाहुनीवेगळा ॥ सदास्वरूपानंदाचासोहळा ॥ दुःखीपाहुनीजीवासकळा ॥ अवतारघेऊनीसांभाळीं ॥५९॥

मायावच्छिन्नईशचैतन्य ॥ तेथेंनाहींस्त्रीपुरुषभान ॥ जगव्यापारव्हावयापूर्ण ॥ अनेकव्यक्ति धरीतसे ॥६०॥

ब्रह्माहरीहरपुरुषावृत्ती ॥ सावित्रीरमाउमास्त्रीमूर्ती ॥ ह्याअवघ्याधरिल्याव्यक्ति ॥ एकईशचैतन्य ॥६१॥

यांतकोटेंपतिपत्नीभाव ॥ कोठेंबंधुभगिनीभाव ॥ कोठेंमातापुत्रभाव ॥ घरोनी असतीसर्वदा ॥६२॥

नानाअवतारघ्यावें ॥ मारूनीदुष्कृतीतारावें ॥ सुकृतीतेसुखीकरावें ॥ स्वर्ग मोक्षदेऊनी ॥६३॥

रेणुकाआदिशक्तिसाचार ॥ महाविष्णुतोपरशुधर ॥ याचें अवतारचरित्रपवित्र ॥ ऐकतांपवनहोईजे ॥६४॥

तरीआतांरेणुकादेवी ॥ प्रगटहोऊनियांबरवी ॥ दर्शनदेऊनियांसमजावी ॥ भार्गवरामासीतेधवां ॥६५॥

जायपुत्रातूंयेथुन ॥ संकल्पाअपलाकरीपूर्ण ॥ एकविसवारक्षत्रियमर्दुन ॥ धराभारदुरकरी ॥६६॥

हेंतुजयोग्यनव्हेस्थान ॥ येथेंमाझेंसान्निध्य अयोग्यजाण ॥ यास्तवमहेंन्द्रपर्वतीं जाऊन ॥ राहेपुत्रासुखरुप ॥६७॥

पुढेंसातवे अवतारी ॥ जन्मशीलकौशिल्याउदरीं ॥ रघोकुलीं अयोध्यानगरीं ॥ दशरथपुत्रहोशील ॥६८॥

रावणवधावयाजाण ॥ तूरामावतारघेसीलपूर्ण ॥ तुझें अंशतेबंधुतीन ॥ लक्ष्मणभरतशत्रुघ्नहोतील ॥६९॥

पिताज्ञामानुनीनिश्चिती ॥ तुंसीतालक्ष्मणासमवेत ॥ चवदावर्षेराहसीवनांत ॥ ऋषीसमस्तभेटतील ॥७०॥

गोदातीरींपंचवटीस्थानीं ॥ भिक्षुरुपरावणयेऊनी ॥ तुम्हादोघांसीमोहितकरुनी ॥ भार्यातुझीनेईलतो ॥७१॥

जटायुदशरथामित्र ॥ तो रावणासीयुद्धकरीलघोर ॥ रावणजटायुसजिंकुनसत्वर ॥ सीतेसीघेऊनीजईल ॥७२॥

सीतावियोगें दुःखेहोऊनी ॥ तुम्हीहुडकिताफिरालवनीं ॥ जटायुभेटेलतुम्हांलागूनी ॥ सांगेलसरवृतांत ॥७३॥

जटायुम्हणेलरामराया ॥ रावणेंचोरूनीतुझीजाया ॥ घेऊनिचाललावलाह्या ॥ मगमींत्यासी अडविलें ॥७४॥

त्याचेंमाझेंयुद्धझालें ॥ त्याचेंमाझेंपक्षछेदिले ॥ मममुमुर्षकरूनीनेलें ॥ सीतेसीतेव्हांदुर्जनें ॥७५॥

लंकामार्गेरावणगेला ॥ तुम्हींजावेंत्यादिशेला ॥ ऐसेंजटायुवचनाला ॥ ऐकालतुम्हीत्याकाळां ॥७६॥

दक्षिणदिशेसीतुम्हीजाताल ॥ तेव्हांयमुनपर्वतीयेंताल ॥ क्षुधेनेंपीडितहोताल ॥ नमिळेल तेव्हांफलतोय ॥७७॥

तेव्हांतूंतरीकोपोनियां ॥ धनुष्यसज्जकरोनियां ॥ त्यासीबाणलावोनियां ॥ धरणीसाछिद्रपाडशील ॥७८॥

भोगवतीचेंजलाआणोन ॥ तुम्हींतेव्हांकरालप्राशन ॥ लक्ष्मणांकीशिर ठेऊन ॥ निद्राकरशिलश्रमयुक्त ॥७९॥

तेव्हांतथेंमीहोईनप्रगट ॥ योगिनीभैरवचामुंडासगट ॥ ग्रहगण घेऊनीयांस्पष्ट ॥ लक्ष्मणमजसीपाहील ॥८०॥

नवरत्नदीपजोती ॥ आरतीघेऊनियांहातीं ॥ ओवाळावयातुजप्रती ॥ समीपयेईनजेधवां ॥८१॥

लक्ष्मणपुसेलमजझडकरी ॥ तूंकोणकुणाचीनारी ॥ कांएकटींआलीसवनांतरीं ॥ किंवावनदेवतातूं आहेसी ॥८२॥

अथवाकपटरूपीतूंराक्षिसी ॥ कोणतेहेतूनें आलीसी ॥ जायमाघारींदुरवेगेंसी ॥ आम्हींतापसी आहोंत ॥८३॥

आम्हीएकपत्नीव्रत ॥ ब्रह्माचारी वृतानेंयुक्त ॥ सीताविरहेंदुःखेंदुःखित ॥ होऊनी आहोंतवरानने ॥८४॥

क्रोधेंलक्ष्मणजाजाम्हणत ॥\ रामतरीआहेनिद्रस्थ ॥ त्यासीदर्शनद्यावयानिश्चित ॥ मौनधरूनराहीनमी ॥८५॥

लक्ष्मणम्हणलेतूँ जासी ॥ तरीबाणजाळेंदवडनितुजसी ॥ शब्दाऐकतांचवेगेंसी ॥ रामजागृतहोईल ॥८६॥

समीपयेऊन मजपाहुन ॥ म्हणेलकोणतुं आहेसीसुलक्षण ॥ हातांताअरतीघेऊन ॥ वनाम्तहिंडसीकिमर्थ ॥८७॥

मजवाटेतूंवनदेवता ॥ तरीतुंसत्यसांगेआतां ॥ रामचंद्राइसेपुसतां ॥ हासोनबोलेनमीत्यासी ॥८८॥

पुत्राऐकदेउनमन ॥ जेंमीरामचंद्रासवोलेन ॥ ऐसेंपरशुरामाससंबोधुन ॥ मगरामासबोलेलजगदंबा ॥८९॥

हेरामाबोललासीजाण ॥ त्वंकाशीतीम्हनोनीव वन ॥ तरीहेंचिमाझेंनामजाण ॥ आजपासोनी होईल ॥९०॥

वक्ताश्रोत्यासबोलत ॥ येथीचासमजुनघ्यावाअर्थ ॥ त्वंकाम्हणोनीश्रीरामपुसत ॥ देवीम्हणतहेंनाममाझें ॥९१॥

म्हणोनिआतांकलीयुगांत ॥ प्राकॄतजनहेंसमस्त ॥ तुकाईतुकाबाईम्हणता ॥ जगदंबेसीसद्भावें ॥९२॥

प्रस्तुतचाललीतोकथाऐका ॥ परशुरामसीरेणुका ॥ पुढेंहोणारकथाजेकां ॥ कथिली आणिकहीसांगेल ॥९३॥

यमुनापर्वतींश्रीरामासी ॥ भेटीनीजगदंबाम्हणेत्यासी ॥ मीआलें तुजवरद्यावयासी ॥ सीतावार्ताहीसांगावयासी ॥९४॥

पूर्वावतारीमीतुझीजननी ॥ पुढेंभेटेनम्हणोनी ॥ तुजबोललेंतें आजदिनीं ॥ वचनसत्यम्याकेलें ॥९५॥

ऐसेंबोलोनीश्रीरामासी ॥ रामस्मरलेपूर्ववृत्तासी ॥ माझीजननीभेटलीमजसी ॥ म्हणोनीनमिलेंसाष्टांगें ॥९६॥

लक्ष्मणसहितकैरीलस्तुती ॥ सहस्त्रनामें पूजिलमजप्रती ॥ रेणुकासांगेभार्गवाप्रती ॥ सातवेअवतारींभेटेनामी ॥९७॥

आतांपुत्रातूंएककरी ॥ शत्रकुलातेंसंव्हारी ॥ शंकरम्हणतीते अवसरीं ॥ वरिष्ठाऐकेसावध ॥९८॥

इतकेंपरशुरामासबोलून ॥ रेणुकापावलीअंतर्धान ॥ यास्तवश्रीरामासीदर्शन ॥ जगःदभेनेंदिधलें ॥९९॥

सिद्धचारणमुनीसंवित ॥ श्रेष्ठरभ्ययमुनापर्वत ॥ श्रीरामासीबेटोनीनिश्चित ॥ राहिलीतेथेंजगदंबा ॥१००॥

उत्तराध्यायीकथासुरस ॥ केवळाअहेसुधारस ॥ विनवीपांडुरंगजनार्दनदास ॥ सादरश्रोतोऐकावें ॥१०१॥

इतिश्रीस्कंदपुराणे सह्याद्रीखंडेशंकरवरिष्ठसंवादेतूळजमाहात्मे ॥ चतुर्थाध्यायः ॥४॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतुं ॥