श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय ५

श्रीगणेशायनमः ॥ जयजयरामवरदायनी ॥ श्रीरेणुकेभार्गवजननी ॥ अनुभुतीप्रियकारणी ॥ तुरजादेवीतुजनमो ॥१॥

वरिष्ठमुनीविनवीशंकरा ॥ म्हणेजयदेवासुरेश्वरा ॥ देवदेवापरमेश्वरा ॥ देवपुज्यानमोतुज ॥२॥

पूर्वाध्यायाचेअंतीं ॥ श्रीरामाअलेयमुनापार्वती ॥ तेथेंभेटलीभगवती ॥ ऐसें तुम्हींवणिलें ॥३॥

परीकोणेकाळींझालासंगम ॥ हेंमजकळलेंनाहींसुगम ॥ शंकरम्हणतीऐकउत्तम ॥ तो काळसांगतोंतुजप्रती ॥४॥

त्रेतायुगींनारायण ॥ रावनावधालागुन ॥ झालादशरथनंदन ॥ श्रीरामचंद्रनामें ॥५॥

रावणवधाचाहेतुपूर्ण ॥ किंचितकैकयीनिमित्तकारण ॥ चतुर्दशवर्षाचीमर्यादाकरुन ॥ अरण्यवासाअंगिकारी ॥६॥

सीतालक्ष्मणसाहित ॥ दंडकारण्यामाजींफिरत ॥ अगस्तीवचनेंपंचवटीत ॥ गोदातीरींवासकरी ॥७॥

तेथेंकपटीदशानन ॥ सीतेसीघेउनगेलापळोन ॥ सीतावियोगेंदूःखीहोऊन ॥ रामलक्ष्मणतेकाळीं ॥८॥

जटायुवचनेंकरून ॥ दक्षिणदिशेसीचाललेजाण ॥ तापसवेषेंशोभायमान ॥ यमुनाचलापातले ॥९॥

भूमीसछिद्रपाडुन ॥ भोगावतीचें आणिलेंजीवन ॥ तेंशुद्धिनिर्मळजळप्रशून ॥ तोसंपूर्णकथियलें ॥१०॥

तेअवसरींअंबाआपण ॥ श्रीरामासीभेटलीजाण ॥ वरिष्ठात्वाकेलाप्रश्न ॥ तोसंपुर्णकथियलें ॥११॥

वरिष्ठम्हणदेवातेवेळीं ॥ श्रीरामेंदेवीकैसीस्तविली ॥ सहस्त्रनामेंकैसीपुजिली ॥ तेसविस्तरसांगावें ॥१२॥

शंकरम्हणतीयमुनाचळीं ॥ रामलक्ष्मणाआलेजेवळीं ॥ जगदंबाहीतेचकाळीं ॥ त्यांनीपाहिलीप्रत्यक्षें ॥१३॥

हीतरीआहेमाझीजननी ॥ ऐसेंश्रीरामेंओळखोनी ॥ लक्ष्मणासहितपुढें जाउनी ॥ साष्टांगनमस्कारकेलाअसे ॥१४॥

मगसद्भावेम्रामचंद्र ॥ जोडोनियादोन्हीकर ॥ स्तविता झालाअतिसादर ॥ प्रेमपुर्वकदेवीसी ॥१५॥

त्वरितासुंदरासुभगा ॥ सुस्वात्मिकाबहुरुपगा ॥ भिल्ली त्प्रणिजेअंतरंगा ॥ सर्वप्राणिहितासीतत्पर ॥१६॥

षटचक्रनिवासिनी ॥ सहस्त्रदलबिलासिनी ॥ नागरुपिणीकुंडलिनी ॥ अंबादेवीतुजनमितोमीं ॥१७॥

सोहंमंत्रस्वरुपिणी ॥ धीराअजपाजपरुपिणी ॥ शक्तिसर्ववीजरूपिणी ॥ अंबादेवीतुजनमो ॥१८॥

ऐंबीजावग्भवानी ॥ वागगोचरामंडलरूपिणी ॥ वाचस्पतीनुतशक्तिरूपिणी ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥१९॥

क्लींकामबीजचलनी ॥ चातुर्वर्णकुतनिवसिनी ॥ कामकल्पितकंदर्पमोहिनी ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२०॥

सुधामयीसर्वजननी ॥ सर्वागमसेवितचरणीं ॥ सामिप्यदाइनीभवानी ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२१॥

नवाक्षरापराशांता ॥ षोडशाक्षराइहितमाता ॥ बावन्नमातृकारुपिणीआतां ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२२॥

कल्पातीताविष्णुमाया ॥ बिंदुत्रिकोणकृतालया ॥ षट्‌कोणकोणमध्यस्ततया ॥ अंबादेवीतुजनमितोमी ॥२३॥

वर्तुलाभैरवयुक्ता ॥ अष्टार्णद्विवर्णांकिता ॥ सुलवर्गाष्टकसहिता ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२४॥

चक्रराजमयींमंत्रा ॥ सर्वचक्रसुसेविता ॥ निलावेदाक्षरसुता ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२५॥

तूंसप्तस्वरांनींगायिली ॥ मूर्च्छाग्रामांनींअतिसेविली ॥ तालनाट्यांनीसंतोषविली ॥ अंबादेवेतुजनमितोंमी ॥२६॥

रजोरूपमयीकाली ॥ कालनिद्राप्रवर्तली ॥ विष्णुनयनीमुखींराहिली ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२७॥

सत्त्वस्थासत्त्वसंपन्न ॥ सर्वलोकमनेरामा ॥ लक्ष्मीकमलकरापरमा ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२८॥

कालीतमस्वरूपिणी ॥ सफलकार्यविध्वंसिनी ॥ कलाकाष्टादिकाआकलिनी ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥२९॥

आदिरूपावालरूपा ॥ दीर्घरूपकृशस्वरूपा ॥ स्थुलरूपाअपररूपा ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥३०॥

जयमातेजगज्जननी ॥ यमुनाचलनिवासिनी ॥ योगिनीवृंदतुजानुदिनीं ॥ सेवाकरितीसद्भावें ॥३१॥

तुंभक्तांसीवभुतसुखदेसी ॥ त्यांचेंदुःखहरिसी ॥ भक्ताआवडतीबहुततुजसी ॥ अतिदयाळूतृंअंबे ॥३२॥

तुझेंसामर्थ्यातिथोर ॥ शक्तिरूपातूं अतिगंभीर ॥ तूंपरमेशरीअतिउदार ॥ अंबादेवीतुजनमितोंमी ॥\३३॥

श्रोतेहोऐकएकाग्रचित्तीं ॥ श्रीरामचंद्रेऐसीयारीती ॥ सद्भावेंसप्रेमेंपरभक्ती ॥ जगदंबेचेंस्तवनकेलें ॥३४॥

षंचदशश्लोकेंकरून ॥ स्तविलीजगन्मातापुर्ण ॥ श्लोकार्थपाहतांअतिगहन ॥ तात्पर्यकठिनसमजवया ॥३५॥

श्रुतितंत्रशास्त्रमथुर ॥ सारांशत्यांतीलकाढून ॥ रघुनंदनें केलेंस्तवन ॥ तुळजाजगन्मातेचें ॥३६॥

श्रीयत्रादिप्रकार ॥ दाविलेअसतिसुविचार ॥ निर्गुणसगुणरूपनिर्धार ॥ करुनीस्तविलीजगदंबा ॥३७॥

श्रीशंकरकैलासपती ॥ ऋषीवरीष्ठवरिष्ठसुमती ॥ उभयतासंवदिती ॥ तुळजाकथारसमधुर ॥३८॥

साहित्यासावेंसुंदर ॥ पाककर्तापरमचतुर ॥ अन्नवाढितोअतिउदार ॥ तरिमगतेथेंअतितृष्टी ॥३९॥

रसज्ञभोक्ताक्शुधतौर ॥ परमजिवलगजेवणार ॥ त्याचेंपक्तिसबैसलेइतर ॥ ते अतितृप्तहोतीलकीं ॥४०॥

जगदंबेचीरसाळकथा ॥ त्यावरीशंकरश्रेष्ठवक्ता ॥ वरिष्ठाऋषीभाविकश्रोता ॥ सुकाळतेथेंप्रमेयाचा ॥४१॥

कथाश्रवणार्थींभाविकनर ॥ तुम्हींयावेंधावोनीसत्वर ॥ कर्णद्वारेंजेवालसादर ॥ तरीतृप्तव्हालनिश्चयेसी ॥४२॥

नातरीपवित्रगोडसीतळ ॥ जैसेंभागिअथीचेंजल ॥ तेंसेवितांतात्काळ ॥ पापतापतृषाजाय ॥४३॥

तैसाकथासससेवून ॥ होतालनिष्पापपुण्यवान ॥ सुखीव्हालतरीआळससोडून ॥ सादरव्हावेंश्रवणासी ॥४४॥

शंकरम्हणे ऋषीनायका ॥ यापासिस्तविलीजगदंबिका ॥ मगपुजाकरावयानेटका ॥ आरंभकरीरघुनाथ ॥४५॥

लक्ष्मणतेव्हाभक्तायुक्त ॥ जगदंबेसीननमस्कारकरित ॥ हातजोडोनीउभाराहात ॥ जगन्मातेसंनिध ॥४६॥

परममंगलाभवानी ॥ तिसीपूजितसेकोदंडपाणी ॥ सहस्त्रनामेंतेतुजलागुनी ॥ यथानुक्रमेंसांगतों ॥४७॥

श्रीतुळजासहस्त्रनाममंत्र ॥ याचाऋषीश्रीरामस्वतंत्र ॥ अनुष्टुपछंदपवित्र ॥ तुळजादेवताहोयजेथें ॥४८॥

बीजदेविकामबीजशक्ति ॥ घंटेसंज्ञककीकम्हणती ॥ सकलकामनाविनियोगनिश्चिती ॥ बोलिलाअसे येथेंकीं ॥४९॥

करावेंअगुष्ठादिकरण्यास ॥ तैसेंचकरावेहृदययादिन्यास ॥ एकेददेवतोएकेकांगास ॥ मंत्रोच्चरोनीस्थापावे ॥५०॥

तुरजातमजातिव्राजाण ॥ भैरवीकालिकाम्हणुन ॥ हेषड्देवतानामाभिधान ॥ क्रमेंकरोनीजाणावे ॥५१॥

अंगुष्ठादिषडांगास ॥ मंत्रोचारेंकरुनीन्यास ॥ मगकरावें ध्यानास ॥ स्थिरमनासकोनी ॥५२॥

परात्परतुरजादेवी ॥ पापनाशिनीमंगलाबरवी ॥ सगुणसौभाग्यलावण्यमिरवी ॥ भुवनसुंदरीजगदंबा ॥५३॥

सर्वागेशामसुंदरा ॥ नेसलीदिव्यश्वेतांबरा ॥ चंद्रप्रभाजैसीअंबरा ॥ शोभवीतैसीशोभत ॥५४॥

पूर्णचंद्राचेमंडळ ॥ तैसेंशोभतमुखकमळ ॥ आल्हाद वर्तुळनिर्मळ ॥ बहुसुढाळधबधबीत ॥५५॥

मेघाऐसागंभीर ॥ जेव्हांकरीशब्दोचार ॥ ऐकोनीभिक्तवृंदामयुर ॥ नृत्यकरतीआनंदें ॥५६॥

वायुरहितजैसादीप ॥ तैसेंस्थिरजिचेंरूप ॥ ब्रह्मंडउजळलेंअमूप ॥ अंतरबाह्यप्रकाशे ॥५७॥

ऐसीतेजःपुंजमूर्ती ॥ अष्टभुजाबहुशोभती ॥ तेमजवर्णावयाप्रती ॥ मंदतावाचेसीयेतसे ॥५८॥

अष्टमहासिद्धीकीं अष्टधाप्रकृती ॥ किंवाअष्टदिकपाळपंक्ति ॥ अष्टदिग्गजशुंडाकृती ॥ बाहुशोभतीसरळतैसे ॥५९॥

वस्त्रालंकारयुक्तमुर्तीं ॥ दिव्यायुधेंशोभतीहातीं ॥ बाणचापशुलगदामिरविती ॥ खंगशंखाक्रसतेज ॥६०॥

वरदाभयहस्तकएक ॥ भक्तापरमसुखदायक ॥ खळदुर्जनासूनकटक ॥ विध्वंसत्यांचाकरितसे ॥६१॥

नष्टपापीष्टक्रियाभ्रष्ट ॥ देवादिकादेतीकष्ट ॥ त्यांसीमारुनसुखउत्कष्ट ॥ सज्जनासीकरितसे ॥६२॥

जगदेश्वरीतुळजाभवानी ॥ तिसीसहस्त्रनामेंकरूनी ॥ वनोद्भवपुष्पेंवाहुनी ॥ पूजिताझालाश्रीराम ॥६३॥

प्रथमन्यासविधीकरूनी ॥ मगदृढघ्यानधरोनी ॥ सहस्त्रनामेंपुष्पेंवाहुनी ॥ पूजाकेलीरघुनाथें ॥६४॥

सहस्त्रनामाचाविस्तार ॥ उत्तराध्यायींसपरिकर ॥ विनवितोंजोडुनियांकर ॥ दासपांडुरंगजनार्दन ॥६५॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुळजामाहात्मे ॥ शंकरवरिष्ठसंवाद ॥ पंचमोध्यायः ॥५॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभं भवंतु ॥