श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय १२

श्रीगणेशायनमः ॥ नमस्तेत्वरितेमातस्तुरजेविश्ववंदिते ॥ द्रयार्द्रहृदयेपाहिमांकृपालवलेशतः ॥१॥

स्कंदसांगतमुनीलागुनी ॥ महाविष्णुचेंवचनाऐकोनी ॥ मगतोद्विजनेत्रउघडोनी ॥ पाहताझालाविष्णुसी ॥२॥

साष्टांगनमस्कारकरोनी ॥ स्तविताझालाहातजोडोनी ॥ भक्तिनिंययथामतीकरोनी ॥ गौतमब्राह्मणतेधवां ॥३॥

गौतमौवाच ॥ श्लोक॥ नामःपरेशाय ॥ परात्ममूर्तपरापराणांनिजबोधहेतवे ॥ ज्ञानात्मनेसर्वलयायहेतवे ज्ञानबोधायनमोनमस्ते ॥१॥

टीका ॥ लोकेशजेत्याचाईश ॥ यास्तवम्हणावेपरेश ॥ नमनतुझ्याचरणास साष्टांगेंसीसद्भावें ॥४॥

सर्वजिवाचाबिंबात्मा ॥ यालागींब्नोलिजेपरमात्मा ॥ सर्वावभासकसर्वात्मा ॥ विश्वावभसकसूर्वजैसा ॥५॥

प्रतिक ॥ परापराणांनिजबोधहेतवे ॥ टीका ॥ परम्हणजेब्रह्मादिक ॥ अपरम्हणजेअस्मदिक ॥ यासीउपदेष्टातूंचयेक ॥ अंतर्यामींअससीतूं ॥६॥

निजबोधम्हणजेस्वरूपज्ञान ॥ व्हावयातूचएककारण ॥ अविद्यानिवृत्तितुजविण ॥ नकरवेइतरपरतंत्रा ॥७॥

प्रतीक ॥ ज्ञानात्मने ॥ टीका ॥ तुंज्ञानैकमाअद्वितीय अपेअप ॥ घटपटदिझ्ञानबहुरूप ॥ दिससीउपाधीसंयोगें ॥८॥

सर्वलयायहेतवे ॥ टीका ॥ घटादिवृत्तीचाउद्भवलय ॥ यासीतुंचहेतुहोय ॥ वृत्तीचाउद्भववृत्तीचालय ॥ तूंचसाक्षित्वेजाणसी ॥९॥

समुद्रकारणतरंगासी ॥ तोचलनस्थानत्यासी ॥ तैसावृत्तीउद्भवलयासी ॥ तूंचहेतूअविनाश ॥१०॥

प्रतीक ॥ ज्ञानप्रबोधाय ॥ टीका ॥ ज्ञानासीनाहींवृत्तीचाबंध ॥ तोवृत्तिशुन्यप्रकृष्टबोध ॥ ऐसातूंज्ञानप्रबोध ॥ पुनः पुन्हांनमनतुजअसो ॥११॥

अहंत्यागंनभ्रीभाव ॥ ध्येयैकमात्रस्वभाव ॥ हानमनाचासद्भाव ॥ तरंगलीनसमुद्रजेवी ॥१२॥

श्लोक ॥ नमोस्तुतेदेवजगद्धितैषिणे जगन्मयाय ॥ टीका ॥ ऐसातृंस्वयंप्रकाशदेव ॥

परीजीवनेणतीनिजवैभव ॥ मायावरणींगुंतलेयास्तव ॥ त्याच्याहिताकारणें ॥१३॥

भुतेंद्रियदेवतारूप ॥ स्वयेंहोऊनिनटसीस्वरुप ॥ परिजडविकाराचालेप ॥ निविंकारातुजनसे ॥१४॥

प्रतीक ॥ आत्मनीसंस्थिताय ॥ टीका ॥ सुर्याअहेतैसाअसे ॥ मिथ्याचकींरणींजळभासें ॥ मायायोगोंविकारतैसे ॥ नीळिमाजेवींआकाशीं ॥१५॥

प्रतीक ॥ वेदै ० ॥ टी० ॥तूंस्वरूपाअत्माराम ॥ आहेसीतैसाचाससीउत्तम ॥ सर्वहीश्रुतीस्तवितीपरम ॥ अनेकनामरूपाने ॥१६॥

मायानियंतृत्वेंईश्वर ॥ तुजनमितीदेवसमग्र ॥ धर्मस्थापावयाअवतार ॥ घेसीहितास्तवजीवाच्या ॥१७॥

विराटरूपसाचार ॥ तोतुझाआद्यअवतार ॥ सहस्त्रमूर्तींतुजनमस्कार ॥ सहस्त्रवाहुतुजनमो ॥१८॥

सहस्त्रनेत्रसुसहस्त्रापाद ॥ सहस्त्रहत्तीचक्रादिआयुधें ॥ सहस्त्रमुर्वातूंस्वसिद्ध ॥ सहस्त्रकर्मातुजनमो ॥१९॥

नमोदेवकींनंदना ॥ श्रीकृष्णामधुसूदना ॥ नमौकौशल्यानंदवर्धना ॥ जानकीवल्लभातुजनमो ॥२०॥

नमोभार्गवाक्षत्रियांतका ॥ नमोवामनाबलीमखभंजका ॥ नमोनरहरेदैत्यांतका ॥ वराहरूपातुजनमो ॥२१॥

नमोकूमरूपामंदरधरा ॥ मच्छरूपावेदोद्वारा ॥ नमोभक्तपालकाश्रीधरा ॥ अनंतरूपातुजनमो ॥२२॥

शंकरम्हणेवरिष्ठासी ॥ गौतमेंस्तवूनिमहाविष्णुसी ॥ पुन्हांनमस्कारकरूनीत्यासी ॥ हातजोडूणीविनवीत ॥२३॥

परमभक्तीनेंबोलेमधुर ॥ प्रसन्नाअहेसीदेवाजर ॥ तरीतुझ्याचरणीनिरंतर ॥ चित्तजडोनीराहोमाझें ॥२४॥

दारिद्रदुःखचिखलांत ॥ मीघुडालोंकाढीत्वरीत ॥ द्विजवचनाइकूनकृपावंत ॥ श्रीहरीबोलतद्विजासी ॥२५॥

विष्णुद्विजासीबोलेसत्वर ॥ भीतुष्टलोंतुजसाचार ॥ हेगौतमादेईनवर ॥ तुझ्याइच्छेप्रमाणें ॥२६॥

याजन्मींतूंपुत्रपौत्रयुक्त ॥ स्वजनपरिवारसमवेत ॥ यथेष्टभोगभोगबहुत ॥ अंतीमत्पदवैकुंठाप्रत ॥ बांधवांसहयेशील ॥२७॥

ब्रह्मायाचादिवसपर्यंत ॥ माझेलोकींराहोनीनिश्चित ॥ पुढें क्षत्रियकुलांत ॥ जन्मघेसीलगोदातटीं ॥२८॥

इंद्रद्युम्नमानेंविख्यात ॥ राजहोसलिदृढव्रत ॥ निष्कंटकराज्यकरसीनिश्चित ॥ स्वधमेंप्रजापाळिशील ॥२९॥

पुत्रपौत्रपरिवारसहित ॥ परमधार्मिकयोगयुक्त ॥ देहत्यागानंतरत्वरित ॥ माझेसाजुज्यपावती ॥३०॥

त्वांजेंखणिलेंकुंडयेथ ॥ त्यासीम्हणतिलाविष्णुतीर्थ ॥ त्र्यैलोक्यपावनविख्यात ॥ पृथ्वीवरील होईल ॥३१॥

माघमासींकार्तिकमासीं ॥ यातीर्थीकरूनीस्नानासी ॥ दीपदानेंकरितीभावेंसी ॥ तैलअथवाघृतानें ॥३२॥

तोजाईल माझ्यासायुज्यासी ॥ संदेहयेथेंनधरीमानसीं ॥ याविष्नुतीर्थतीरासी ॥ श्राद्धकरितीजेनर ॥३३॥

त्याचेपितृगणमुक्तहोऊनी ॥ वासकरतीलस्वर्गभुवनीं ॥ येथीच्यास्नानमात्रेंकरोनी ॥ माझ्यालोकास पावती ॥३४॥

साक्षातजदंबायोगिनीसहीत ॥ प्रदोषकालींयेईलस्नानार्थ ॥ प्रत्यक्षदर्शनहोईल निश्चित ॥ भक्तिभावेंकरोनी ॥३५॥

हेगौतमास्वग्रामासी ॥ तूंजायआतांवेगेंसी ॥ सुखभोगघेऊन गृहिंराहसी ॥ अंतीस्वर्गासीजाशील ॥३६॥

स्कदसांगेमुनीजनास ॥ ऐसेंबोलेनीब्राह्मणास ॥ मगतोभगवानहृषीकेश ॥ अंतर्धानपावला ॥३७॥

मगतोगौतमप्रीतियुक्त ॥ होऊनीस्वगृहागेलात्वरित ॥ स्वेच्छापुत्रपय्त्रसमवेत ॥ सुखविषेषभोगुनी ॥३८॥

अंतींस्वभायेंसहित ॥ वैकुंठासीगेलानिश्चित ॥ विष्णुतीर्थमहिमाअदभुत ॥ तुम्हासीकाथिलामुनीश्वरहो ॥३९॥

आतांऔदुंबराख्यतीर्थाचें ॥ महात्म्येऐकातुम्हीसाचें ॥ देवेमंदिराच्या आग्नेयकोनाचे ॥ प्रदेशांतासेतीर्थ ४०॥

ब्रह्मऋषीपुजिततीर्थ ॥ जैथेंसाक्षातउमांकांत ॥ भैरस्वरूपेंकरोनीतीर्थ ॥ नैऋत्यभागींआहेपै ॥४१॥

तेथेंसर्वलोकवरदानी ॥ पार्वतीरमणपिनाकपाणी ॥ इंद्रादिसकलदेवत्यास्थानीं ॥ व्यवस्थितअसती ॥४२॥

त्यांनींलोकानुग्रहार्थ ॥ निर्मिलेंऔदुंबराख्यतीर्थ ॥ ज्याच्यास्नानेंकरुनीपुनीत ॥ शिवसायुज्यानरजाती ॥४३॥

शिवरात्रीपर्वकाळीं ॥ स्नानकरोनीतयेकाळी ॥ निराहारजागरनिशाकाळीं ॥ सिद्धेश्वरासीपुजिती ॥४४॥

देवापितराचेंकरितीयजन ॥ तेशिवसायुज्यासजाउन ॥ शिवासहाअनंदपावून ॥ ब्रह्मादीनपर्यंत राहती ॥४५॥

पुढेंउत्तमकुळॆएंजन्मघेवोन ॥ होतीविद्वानधनसंपन्न ॥ यालोंकिंबहुसुखभोगुन ॥ मोक्षमार्गासीमगजाय ॥४६॥

आलीयाभौमवारदीन ॥ औदुंबरीकरूनस्नान ॥ कालनाथाचेंकरावेंपुजन ॥ तैलाभ्यंगादिउपचारें ॥४७॥

स्नानगंधकर्वीरसुमन ॥ धूपदीपमापभक्तान ॥ भक्ष्यभोज्यादिपकान्न ॥ समरपावेभक्तिनें ॥४८॥

बालभैरवासहित ॥ पुजोनियांकालनाथ ॥ कापालिकपूजावेंनिश्चित ॥ पात्रअन्नानेंपूर्णकीजे ॥४९॥

माषादिवटकादिअन्नेंकरून ॥ कापालिकासीद्यावेंभोजन ॥ यापरी भैरवाआराधन ॥ करिलभक्तिभावानें ॥५०॥

तेयालोकींलक्ष्मीवंत ॥ पुत्रपौत्रसमवेत ॥ अंतींकालनथपदाप्रत ॥ जाईलान्यथानव्हेची ॥५१॥

कालष्टमीदिवशींस्नान ॥ करोनियांउपोषण ॥ कालनाथाचेंपुजन ॥ रात्रींकरीलजोनर ॥५२॥

ब्रह्माचारीदृढव्रत ॥ रात्रींजागरकरीत ॥ धर्मअर्थकाममोक्षनिश्चित ॥ चारीपुरुषार्थातोपावे ॥५३॥

क्षयपस्मारकृष्टादिथोर ॥ व्याधिग्रस्तजोझालानर ॥ त्याचेंऔदुंबरतीर्थींसाचार ॥ स्नानकरवेंआठदिवस ॥५४॥

तोहोईलव्याधीरहित ॥ आणिइच्छिलेंफल होईलप्राप्त ॥ रविसंक्रांतव्यातिपात ॥ पर्वकाळाणीक ॥५५॥

त्यादिवसेहेंभैरवपुजन ॥ करावेंपंचामृते करुन ॥ अथवाकेवळदुग्धेंकरून ॥ अथवाअभिषेकघृताचा ॥५६॥

अथवानारिकेलोदकानें ॥ दधींकिंवा आम्ररसानें ॥ अभिषेकाथवाईक्षुरसाणें ॥ जोभक्तीनेंकरील ॥५७॥

यापरीअभिषेककरून ॥ जोकरीलभैरवपूजन ॥ त्यासीप्राप्तकैलासस्थान ॥ अखंडसुखाएसेपावेलतो ॥५८॥

सूर्योंदयहोता अंधारनाशे ॥ तात्काळचीजैसाहोतसे ॥ कालनाथदर्शनतैसें ॥ घडेपरमभक्तीनें ॥५९॥

कालनाथाचेंमाहिमान ॥ सर्वतुम्हांसीकेलेंकथन ॥ औदंबरतीर्थाचेंमहात्म्यपूर्ण ॥ आहेतैसेंवर्णिलेंम्यां ॥६०॥

आतांनागतीर्थाचें महात्म्य ॥ पुढेंसांगेनातिउत्तम ॥ स्कंदमुनेश्वरासांगेलपरम ॥ शंकरवरिष्ठाकारणें ॥६१॥

तीकथायथामतीकरुन ॥ वर्णींलपांडुरंगजार्दन ॥ श्रोतेद्यावेंअवधान ॥ कथाआदरेंऐकावया ॥६२॥

इतिश्रीस्कंदपुराणेसंह्याद्रिखंडतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ द्वादशोध्यायः ॥१२॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥