श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय २३

श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥

नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ जिव्हाग्रीस्थीर होऊनिया ॥ वाग्विलसाचालवी ॥२॥

नमोमहाविष्णुजगदगुरु ॥ उपदेशकर्तापरमचतुरु ॥ अंतर्यामींप्रेरकसदगुरु ॥ आचार्यरूपीपरमात्मा ॥३॥

श्रोतेव्हावेंसावधान ॥ कैलासर्पतींविराजमान ॥ पार्वतीसहितपंचवदन ॥ देवादिदेवजगदगुरु ॥४॥

त्यासीएकेकाळीपार्वती ॥ भक्तियुक्तपरमचित्तीं ॥ होऊनीपुसतीझालीसती ॥ यमुनापर्वतीजींतीर्थें ॥५॥

यमुनापर्वतींनागतीर्थ ॥ महापूण्य़कारकसमर्थ ॥ कोणींनिर्मिलेंयथार्थ ॥ तेंमजसांगाप्राणनाथा ॥६॥

शंकरम्हणेहोपर्वतनंदिनी ॥ स्कंदमुखेंसर्वऋषीनीं ॥ पुराणाइकिलेंमगतेक्षणीं ॥ प्रश्नकेलाभक्तिनें ॥७॥

ऋषीम्हणतीयमुनापर्वती ॥ पर्वत्रातीर्थेंआहेत किती ॥ कोणतीनामेंतीर्थाप्रती ॥ सर्वहीसांगावीषण्मुखा ॥८॥

स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ सर्वहीतीर्थेंतुम्हाप्रती ॥ सांगतोंऐकएकाग्रचित्तीं ॥ ऐकिल्यानिष्पापहोयप्राणी ॥९॥

यमुनापर्वताग्रींपवित्र ॥ आदिक्षेत्रतुळजापुर ॥ जेथेंविराजमानसुंदर ॥ अनादिसिद्धजगदंबा ॥१०॥

श्रीदेवीच्यापूर्वदिश्सी ॥ तीर्थपावनपुण्यराशी ॥ जेंसेवनकरितीदेवऋषी ॥ जेथेंस्वयमेवशेषवसे ॥११॥

नागाधिपओमहासमर्थ ॥ जेणेंनिर्माणकलेंतीर्थ ॥ लोकोपकाराकारणेंनिश्चित ॥ नागतीर्थनामयास्तवज्यासी ॥१२॥

ऋषीम्हणतीपडाननासी ॥ शेषोंनिर्माणकेलेंतीर्थासी ॥ कायाआचरलातपासी ॥ किंवादानासीकालकेलें ॥१३॥

सर्वसांगावेंआम्हासी ॥ कूपाकरुनवेंगेसी ॥ स्कंदम्हणेशंकरासी ॥ ऐसेंचपुसिलेंवरिष्ठें ॥१४॥

शंकरेंसांगितलेंतयासी ॥ तेंचमीसांगतोतुम्हासी ॥ एकदांयमुनापर्वतासी ॥ शेषयेऊनपाहतसे ॥१५॥

पर्वतेपाहिलींतीर्थेबहुत ॥ त्यांतएकपाहुनउत्तमतीर्थ ॥ पापहारकपुण्ययुक्त ॥ स्वनामेंनिश्चितकरिताझाला ॥१६॥

यातीर्थीम्स्नानकरिती ॥ तेविपत्तीसीतरुनीजाती ॥ विख्यातझालेत्रिजगतीं ॥ लोकपावनउत्तम ॥१७॥

यातीथींकुंतीसुत ॥ राजायुधिष्ठिरविख्यात ॥ भीमार्जुनादिंबधूसहित ॥ द्रौपदीसमवेतप्राप्तझाला ॥१८॥

लोमेशऋषीसवेंचासत ॥ तीर्थयात्राकरीतकरीत ॥ आलानागतीर्थसीअकस्मात ॥ धर्मराजतेवेळीं ॥१९॥

लोकेशऋषीलागींपुसत ॥ नागतीर्थाचावृत्तांत ॥ ॠषीम्हणेऐकसावचित्त ॥ नागतीर्थाचेंमहात्म्य ॥२०॥

पूर्वीकृतयुगींसोमवंशात ॥ बिल्वनामाराजाविख्यात ॥ यमुनाचळींअसेंराहत ॥ पालनकरीतपृथ्वीचें ॥२१॥

त्याचीभार्याचंद्रावती ॥ महाभाग्यवत्तीसती ॥ तिसीसहरममाननृपती ॥ राज्यनीतीनेंकरितसे ॥२२॥

राजाएकदाअरण्यांत ॥ संवेंसेनाघेऊनीबहुत ॥ मृगयाकरावयाजात ॥ करीघातवनचराचा ॥२३॥

सिंहवघावाराहशशक ॥ गवयमृगमच्छपक्षीअनेक ॥ निष्ठूरघायेंमारीदेख ॥ वनांतधांवतचहूंकडे ॥२४॥

वनांतमृगएककामुक ॥ हरणीसर्वेंक्रीडतानिःशंक ॥ त्यावरीसोडोनीतिक्ष्णसायक ॥ प्राणघेतलामृगाचा ॥२५॥

तेव्हांमृतेंमनुष्य वाणी ॥ शापदिधलानृपालागुनी ॥ दुष्टपापिष्टाअधर्मकरणी ॥ केलीत्वातरीयेवेळी ॥२६॥

मीस्त्रीसंगेंक्रीडत असतां ॥ तुंप्रवृत्तहोऊनीमाझियाघाता ॥ नाशकेलासीसर्वथा ॥ स्त्रीसंयोगसुखाचा ॥२७॥

स्त्रीसंय्होगानंदाचा ॥ अनुभवतुजलाअसेसाचा ॥ तरीतुजाअतांस्त्रीसुखाचा ॥ लाभहोणारनाहींच ॥२८॥

रात्रींसमयींशयनावर ॥ कृमीमयहोईलतुझेंशरीर ॥ इतुकेंबोलोनतोमृगवर ॥ अदर्शपावला ॥२९॥

राजाहिसेवकसहित ॥ सत्वराअलानगराप्रत ॥ मनींहोऊनीदुःखीत ॥ वॄत्तातसांगताभायेंसी ॥३०॥

रात्रींकाळीशापफळित ॥ झालामृगाचाथार्थ ॥ राजशरीराकस्मात ॥ कृमीपुंजझालातेधवां ॥३१॥

राजभार्यापाहोनी ॥ आश्रर्यकरूलागलीमनीं ॥ दुःखेंनिद्रागेलीपळोनी ॥ कृमीसीरक्षितबैसली ॥३२॥

कृमीचहोकडेजातीधांवोनी ॥ त्यासीएकाग्रकरीराजपत्‍नी ॥ सूर्योदयहोतांचक्षणीं ॥ राजापूर्ववतहोतसे ॥३३॥

दिवसाऋढराजशरीर ॥ रात्रींकृमीमयहोसत्वर ॥ तेव्हांरक्षितसेसुंदर ॥ राजपत्‍नीपतिव्रता ॥३४॥

यासीलोटलेदिवसफार ॥ पुन्हांएकदांतोनृपवर ॥ सवेंघेऊनीसेनाभार ॥ मृगथार्थगेलावनांत ॥३५॥

पारधीकरितांश्रमलाबहुत ॥ क्षुधेतृषेनेंझालाव्याप्त ॥ तेव्हांसेवकासीआज्ञाकरीत ॥ उदकाअणरेम्हणोनी ॥३६॥

सेवकधांवतीचहोंकडे ॥ उदककोठेंत्यानातुडे ॥ परतोनीआलेरायाकडे ॥ उदकनमिळेम्हणतीते ॥३७॥

त्यांतुनएकसेवक ॥ अरण्यातशोधीतहोताउदक ॥ तेणेंदेखिलेंअल्पउदक ॥ गोष्पदमात्रसंचलेजें ॥३८॥

तेणेंतेंजळचांगलें ॥ युक्तिईनेंपातघेतलें ॥ जलेंपात्रतभेरलें ॥ त्वरितनिघालारायाकडे ॥३९॥

जलेंरायाचेंमनाअनंदले ॥ किंचितनेत्रासीलाविलें ॥ चुळकमात्रमुखींघातलें ॥ मगतोआलानगरासी ॥४०॥

घरींयेऊनभोजनकेलें ॥ क्षुधेतृषेसीदवडिलें ॥ रात्रींसमयींशयनकेलें ॥ पर्यकवरीनृपनाथें ॥४१॥

चंद्रावतीभार्यातेथ ॥ बसलीहोतीरक्षणकरीत ॥ तिनेंदेंखिलेंअद्भुत ॥ राजशरीरींतेकाळीं ॥४२॥

सर्वशरीरकॄमीभूत ॥ पाहतीझालीपूर्ववत ॥ परीमुखनेत्रदोन्हीहस्त ॥ जैसेंतैंसेंचपाहिलें ॥४३॥

रात्रीसरलियानंतर ॥ राजापावलापूर्वशरीर ॥ हापाहूनचमत्कार ॥ भार्याविस्मयकरितसे ॥४४॥

सर्वशरीरकृमीयुक्त ॥ नित्यराजाहोतअसत ॥ आजमुखनेत्रकरद्वययुक्त ॥ कृमिरहितराहिला ॥४५॥

याचेंकारणकायअसावें ॥ हेंतरीनॄपासीचपुसावें ॥ चंद्रावतीनृपासीबरवें ॥ अन्योक्तीनेंपुसतसे ॥४६॥

म्हणेजीस्वामीनृपनाथा ॥ तुम्हीवनांतगेलाहोता ॥ कायाअपूर्वपाहिलेंतत्वतां ॥ औषधअथवाअन्यकांहीं ॥४७॥

तेंमजसांगावेंप्राणपती ॥ राजाम्हणेभायेंप्रती ॥ कायहेतुंधरोनीचित्तीं ॥ पुससीतेंमजाअधींसांग ॥४८॥

राजपत्नीनबोलेवचन ॥ राजाहीघरोनीराहिलामौन ॥ यासीलोटलेकांहीक्षण ॥ मगातिनेंसेवकपाचारिले ॥४९॥

लोमेशसांगीधर्मराया ॥ परमचतुरतीराजभार्या ॥ सेवकासीविचारावया ॥ लागलीतेव्हांयुक्तीनें ॥५०॥

अरेतुम्हीनूपासहित ॥ कालगेलाहोतावनांत ॥ कायवर्तमानझालेंतेथ ॥ तेंमजप्रतीसांगावें ॥५१॥

राजासीकोणीउदकदिधलें ॥ किंवाऔषधचांगलें ॥ आणुनदिधलेंअसेलभलें ॥ तेंमजसांगालवलाही ॥५२॥

मगत्यासेवकातुनएकनर ॥ राजभायेंसीदेतउत्तर ॥ नृपासीतृषालागतांफार ॥ उदकाअणोनीम्यांदिधलें ॥५३॥

ऐकोनीसेवकाचेंउत्तर ॥ राजभार्यासंतोषलीथोर ॥ म्हणेकोठेंतेंउदकसाचार ॥ तेंमजस्थळदाखवावें ॥५४॥

सेवकासीसवेंघेऊनी ॥ राजपत्‍नीगेलीतयास्थानीं ॥ उदककीचितदेखिलेंनयनीं ॥ पाषाणावरीसंचलेंते ॥५५॥

राजपत्‍नीतयेवेळीं ॥ लहानवस्त्रखंडत्याजळीं ॥ मिजवोनघ्टांततेव्हापिळी ॥ शनैःशनैःबहुवेळ ॥५६॥

ऐसियायुक्तीनेंतेवेळे ॥ घटपूर्णकेलाजळें ॥ तोघेऊनीशिघ्रकाळें ॥ निजगृहप्रतीपातली ॥५७॥

मगत्याउदकानेंनॄपासी ॥ स्नानघातलेंत्वरेसी ॥ तेणेंतोकृमीरहिततेजोराशी ॥ दिव्यशरीरझालासे ॥५८॥

रात्रींसमयींपर्यकावर ॥ शयनकरिताझालानॄपवर ॥ राजाकुमीरहितदिव्यशरीर ॥ पाहूनभार्यासंतोषली ॥५९॥

चंद्रावतीहर्षलीपूर्ण ॥ पतीसवेहोतसेरममाण ॥ स्नानमात्रेंशापमोचन ॥ राजाआरोग्यतेसीपावला ॥६०॥

राजहोऊनीविस्मयुक्त ॥ प्राप्तःकाळींभार्येसहित ॥ सेवकपरिवारघेऊनत्वरित ॥ जळासमीपपातला ॥६१॥

राजाहोऊनाअदरयुक्त ॥ जलाशयविस्तीर्णकरुंम्हणत ॥ सेवकासीआज्ञाकरीत ॥ सखोलभूमीकरावया ॥६२॥

तेचक्षणीआकाशवाणी ॥ बोलतीझालीराजालागुनी ॥ लोहपातया मेदिनी ॥ करुनकोसर्वथा ॥६३॥

जेणेमस्तकींधरिलीधरणी ॥ जोनागराजशेषफणी ॥ तेणेंहेंतीर्थनिर्मिलेंमेदिनीं ॥ नागतीर्थम्हणतीयास्तव ॥६४॥

त्वांतरीयेथेंएककरावें ॥ नागेशअरनामेंलिंगस्थापावें ॥ तेणेंसर्वलोकांतबरवें ॥ प्रख्यातहोशीलराजेंद्रा ॥६५॥

लोमेशम्हणेधर्मरायसी ॥ ऐकोनाअकाशवाणीसी ॥ बिल्वनृपेंस्थापिलेंलिंगासी ॥ नागेश्वरनामेंप्रसिद्ध ॥६६॥

लोमेशम्हणेपार्थिवश्रेष्ठ ॥ युधिष्ठराधर्मवरिष्ठा ॥ नागतीर्थाचीप्रतिष्ठा ॥ यथावतवर्णिलीम्यातुंज ॥६७॥

जेनरव्याधीपीडितहोती ॥ तेयानागतीर्थीस्नानकरिती ॥ जपतपर्पणहोमाअचरिती ॥ भावेंपुजितीनागेशा ॥६८॥

तेयालोकींआरोग्यहोती ॥ अंतीस्वर्गमंदिराजाती ॥ फारकायबोलूकीर्ती ॥ देवहीभजतीयातीर्था ॥६९॥

पूर्वीश्रीरामलक्ष्मण ॥ रणीरावणासीजिंकुन ॥ जानकीचास्वीकारकरुन ॥ लंकेहूनपरतले ॥७०॥

जैसेंसुवर्णकसींलाविजे ॥ अग्नींघालुनतापविजे ॥ शुद्धसमजोनीघेईजे ॥ तैसेंकैलेंश्रीरामें ॥७१॥

रावणेंकरागृहीठेविलेंम्हणोनी ॥ सीतेसीअग्निप्रवेशकरवूनी ॥ लोकापवदटाकिलाजाळोनी ॥ स्वीकारलेंमगसीतेसी ॥७२॥

सीतारामलक्ष्मण ॥ पुष्पकविमानींआरुढहोऊन ॥ येऊननागतीर्थींस्नान ॥ करूनगेलेअयोध्येसी ॥७३॥

श्रोतेसंशयघेऊनपुसती ॥ बहुततीर्थेंआहेतक्षितीं ॥ तींसोडोनीश्रीरघुपती ॥ नागतीर्थासीकांआले ॥७४॥

आतांऐकायाचेंउत्तर ॥ रावनासीवधावयासाचार ॥ महाविष्णुचाअवतार ॥ तोश्रीराम अयोध्येंतप्रगटला ॥७५॥

शेषतोचलक्ष्मणजाण ॥ लक्ष्मीचसीताप्रगटलीपूर्ण ॥ हेत्रिवर्गराहिलेयेऊन ॥ पंचवटीमाझारी ॥७६॥

तेथेंरावणेकपटकेलें ॥ भिक्षुरूफेसीतेसीमोहिलें ॥ कपटबळेंलेंकेसीनेलें ॥ सीतेलागींसत्वर ॥७७॥

सीतावियोगेंकरुन ॥ उभयतांरालक्ष्मण ॥ हिंडोलागलेवनोवन ॥ शोधावयासीतेसी ॥७८॥

अकस्माताअलेयमुनापर्वतीं ॥ तेथेंभेटलीश्रीभगवती ॥ तुळजादेवीआदिशक्ति ॥ सच्चिदानंदप्रत्यक्ष ॥७९॥

श्रीरामाचेंसाधानकेलें ॥ सीताप्राप्तीचेउपायकथिले ॥ नागतीर्थाचेंमहत्त्ववर्णिलें ॥ जगदंबेनेंस्वयतेव्हा ॥८०॥

अष्टतीर्थपरिवारांत ॥ परमश्रेष्ठनागतीर्थ ॥ स्नानकरितांमनोरथ ॥ सफळहोतीप्राणियांचे ॥८१॥

तीअष्टतीर्थेंकोणकोण ॥ त्यांचीनामेंआतासांगेन ॥ प्रथमनागतीर्थजाण ॥ नृसिंहतीर्थदुसरे ॥८२॥

तिसरेंजाणावेंसर्वतीर्थ ॥ चवथेंतेम्मैराळतीर्थ ॥ पांचवेंजाणावेंरामतीर्थ ॥ मुद्गलभैरवतीर्थसहावें ॥८३॥

विष्णुतीर्थतेंसातवें ॥ लघुतीर्थजाणआठवे ॥ सीताप्राप्तिकाभेंत्वारांमाबरवें ॥ स्नानकरावेंअष्टतीर्थीं ॥८४॥

नागतीर्थाच्याआग्नयकोणात ॥ नॄसिंहतीर्थसदासिद्धीदेत ॥ तेथीच्यास्नानपानेविख्यात ॥ वैक्कुंठवाससदाजोडे ॥८५॥

नृसिंहतीर्थाच्यापश्चिमदिशेंत ॥ सर्वतीर्थअसोविख्यात ॥ तेथेंस्नानदानकेलियानिश्चित ॥ वैकुंठलोकजोडतसे ॥८६॥

सर्वतीर्थाच्यानैऋत्यदिशे ॥ भैरलदेववसतसे ॥ तुआच्यादर्शनेकैलासजोडतसे ॥ यालोकीयेथेष्टसुखप्राप्ती ॥८७॥

मैराळाच्याउतरभागांत ॥ रामातीर्थअसेवसत ॥ तेथीलस्नानपानोनिश्चित ॥ गर्भवासचुकतसे ॥८८॥

रामतीर्थाच्यापूर्वभागांत ॥ मुद्गलतीर्थविख्यात ॥ तेथेंभैरवासेराहत ॥ दर्शनेंपातकेंजळतीज्याच्या ॥८९॥

भैरवाच्याउत्तरभागांत ॥ भीमपार्वतीतीर्थअदभुत ॥ तेथेंपंचपांडवासहित विष्णुरहातसर्वदा ॥९०॥

शंकरसांगेवरिष्ठाप्रत ॥ पूर्वयुगींहोंविष्णुतीर्थ ॥ पुढेंपांडवतीर्थनामप्राप्त ॥ धर्मराजास्तबझालेंसें ॥९१॥

नागतीर्थाच्यानैऋत्यभागांत ॥ लघुतीर्थग्राहोविख्यात ॥ तेथीचेंजलपवित्रबहुत ॥ गंगाजलतुल्यअसे ॥९२॥

रामासीजगदंबासांगत ॥ स्नानयोग्य अष्टतीर्थ ॥ रामझालभक्तियुक्त ॥ तीर्थप्रसिद्धिऐकोनी ॥९३॥

माझीइच्छाव्हावीफलित ॥ सीतामजव्हावीप्राप्त ॥ मगमीसीतेहसहित ॥ स्नानादिककरीनभक्तिने ॥९४॥

ऐसासंकल्पमनांतकरुन ॥ अतित्वरेंश्रीरामलक्ष्मण ॥ लंकेसीजाऊनरावनामारून ॥ सीतेसीघेऊनपरतले ॥९५॥

जैसाएखादाप्राकृतनर ॥ लाभहोताचहर्षनिर्भर ॥ तैसाचश्रीरामचंद्र ॥ सीताप्राप्तीनेंसतुष्ट ॥९६॥

सीतेसहितरघुनंदन ॥ अष्टतीर्थाचेंकरुनियास्नान ॥ पुष्पकविमानींआरुढहोऊन ॥ लंकेहुनीनिघाले ॥९७॥

आकाशमागेंविमानगती ॥ प्रथमाअलेश्रीशैल्यपर्वतीं ॥ मल्लीकार्जुनासीपूजोनीनिश्चिती ॥ तेथोनीसत्वरनिघाले ॥९८॥

नागतीर्थासीजाऊन ॥ अष्टतीर्थाचेंकरावेंस्नान ॥ जगदंबेचेंघेऊनदर्शन ॥ अयोध्यासीमगजावें ॥९९॥

ऐसेंरामाचेमनोगत ॥ तदनुरुप विमानचालत ॥ इकडेजगदंबाहित्वरित ॥ सन्मुखयेतरामासी ॥१००॥

रामावरीप्रेमबहुत ॥ पुत्रस्नेहेंरामासीपाहात ॥ रामहीलक्ष्मणसीतेसहित ॥ भुतळीउतरलेधवां ॥१०१॥

जगदंबेसीशाष्टांग नमन ॥ तिघांनींकेलेंक्रमेंकरुन ॥ रामम्हणेतुझ्याप्रसादेंकरुन॥ सीतेसहितमीआलों ॥१०२॥

देवीसहितविमानीबैसुन ॥ नागतीर्थासीपातलेजाण ॥ तंवतेथेंहिजगदंबासगुण ॥ बटुदेवसहितदेखिली ॥१०३॥

अनंतरूपअनंतमूर्ती ॥ जगदंबासर्वत्रासेनिश्चिती ॥ श्रीरामदेवीसहितीस्थिती ॥ नागतीर्थींकरिताझाला ॥१०४॥

जगदंबाहोऊनीप्रमभरीत ॥ श्रीरामासीपुसेवृत्तांत ॥ श्रीरामेंझालाजोवृत्तांत ॥ निवेदनकेलाअंबेसी ॥१०५॥

जैसापुत्रदुरदेशींगेला ॥ तोपरातोनीमातेजवळींआला ॥ मातापुसोलागेतयाला ॥ क्षेमकुशलवृत्तांत ॥१०६॥

तैसेंतुळजेनेंविचारलें ॥ श्रीरामेंसर्वनिवेदनकेलें ॥ सीतेसहितस्नानकेलें ॥ अष्टतीर्थांचेंश्रीरामें ॥१०७॥

स्वनामेंलिंगस्थापन ॥ तयाचेंकरोनीपुजन ॥ जगदंबेचीआज्ञाघेऊन ॥ त्वरितगेलेअयोध्येसी ॥१०८॥

लोमेशम्हणेधर्मराजाप्रत ॥ रामेंस्थापिलेंलिंगयेथ ॥ यास्तवरामनामविख्यात ॥ झालेंअसेधर्मराया ॥१०९॥

तुंहीबंधुभायेंसहित ॥ स्नानदानकरीयातीर्थात ॥ देवऋषीपितृतर्पणत्वरित ॥ करीब्राह्मणभोजन ॥११०॥

स्कंदम्हणेऋषीलागुन ॥ लोमेशऋषीचेंऐकोनवचन ॥ धर्मराजेंनागतीर्थीस्नान ॥ बंधुभार्येंसहितकेलें ॥१११॥

नागेशरामेश भैरवपूजन ॥ जगदंबेचेंकेलेंपजन ॥ देवादिकांचेंकरूनीतर्पण ॥ अनेकदानकरितांझाला ॥११२॥

द्रौपदीभीमसेनहस्तेकरुनी ॥ करविलींनानाविधपक्वान्नं ॥ बाह्मणांसीदिधलेंभोजन ॥ धर्मराजेंतेंधवा ॥११३॥

ऐसातीर्थाविधीकरुन ॥ श्रेशैलपर्वतापांडुरनंदन ॥ बंधुभार्यासहवर्तमान ॥ जाताझालातेधवां \॥११४॥

गोष्पदमात्रनागतीर्थी ॥ श्रावणशुक्लपंचमीतीथी ॥ जेनरस्नानकरोनीपुजिती ॥ नागेश्वरदेवातें ॥११५॥

तेनरसर्वपापानिर्मुक्त ॥ स्नानमात्रेंहोतीकृतार्थ ॥ हिंसाचोरीपापनिवृत्त ॥ जलस्पशेंहोतजयाच्या ॥११६॥

पूर्वकर्मास्तवनिश्चित ॥ नानाव्याधीनेंझालाग्रस्त ॥ तरीपांचदिवसनगतीर्थात ॥ स्नानेंआरोग्यहोतसे ॥११७॥

पांचदिवसस्नानकरुन ॥ जोनागेशभैरवदेवीपुजन ॥ करीलत्याचादेहदृढहोऊन ॥ पुत्रपौत्रासहनांदे ॥११८॥

अंतीशिवपदाचीप्राप्ती ॥ तेथुनीनाहीपुनरावृत्ती ॥ भक्तिभावधरोनीचित्तीं ॥ जेस्नानकरितीयथाविधी ॥११९॥

जीस्त्रातीनसप्तकपर्यंत ॥ स्नानकरोनीनागतीर्थात ॥ अंबानागेशभैरवासीपुजीत ॥ दानदेतब्राह्मणासी ॥१२०॥

तीवंध्याकिंमृतवंध्यानारी ॥ गर्भस्त्रावीकींदुर्भगाजरी ॥ निर्दोषहोऊनीसत्वरी ॥ पुत्रपौत्रवत्तीहोय ॥१२१॥

विद्यावानकुलसंपन्न ॥ धनाढ्यपुत्रहोयसगुण ॥ अपुत्रीपुरुषकरीलस्नान ॥ एकवीसादिवसपर्यंत ॥१२२॥

तोहोतसेपुत्रवान ॥ बहुतधासुखेंहोयसंपन्न ॥ ब्रह्माराक्षसपिशाच्यबाधानिरसन ॥ होतसेस्नानेंतीर्थाच्या ॥१२३॥

क्षयापस्मारकुष्टाव्याधी ॥ जेशरीरातापदेतीनिरवधी ॥ तेसकळहीनाहतीत्रिशुद्धी ॥ तीर्थस्नानसुकृतें ॥१२४॥

ऐसानागतीर्थाचामहिमा ॥ तुजम्याकथिलाविप्रोत्तमा ॥ त्याच्यानैऋत्यप्रदेशींसत्तमा ॥ लघुतीर्थातिविख्यात ॥१२५॥

गंगाजलसमानज्याचेंनीर ॥ पश्चिमतीरींवसेशंकर ॥ पार्वतीसहितसपरिवार ॥ भैरवसहितवसतसे ॥१२६॥

तपकरोनीककोटकनाग ॥ जेथेंपरमपदपावलासांग ॥ देवीच्याप्रसादेंअव्यंग ॥ तीर्थप्रसिद्धझालेंभूलोंकीं ॥१२७॥

यातीर्थाचेंकरितास्नानपान ॥ निष्पापहोतीमानवगण ॥ अंतीसायुज्यपावेजाण ॥ विष्णुलोकींपुज्यहोय ॥१२८॥

तीर्थमहात्म्यउत्तमभक्ति ॥ श्रवणकरितीआणिकरविती ॥ उभयतासीविष्णुसायुज्यप्राप्ती ॥ होतसेनिश्चयें ॥१२९॥

ऐसाशंकरवरिष्ठसंवाजाग ॥ महाराष्ट्रभाषेंतकलाकथन ॥ म्हणेपाडुरंगजनार्दन ॥ जगदंबेच्याकृपेनें ॥१३०॥

इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्येशंकरवरिष्ठसंवादे ॥ नागतीर्थवर्णनंनामत्रयोविंशोध्यायः ॥२३॥

श्रीजंगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥