श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय ३४

श्रीगणेशायनमः ॥ जगदंबासर्वभुतांत ॥ बुद्धिरूपेंहोउनीस्थित ॥ युक्तायुक्तप्रदर्शित ॥ करीतसेतिसीनमनमाझें ॥१॥

स्कंदम्हणेतेव्हांसुरगण ॥ जोविष्णुत्र्यैलोक्यपावन ॥ त्याचेंकरोनियांस्तवन ॥ धरोनीमौनराहिलें ॥२॥

अग्रभागींसुरगणस्थित ॥ विष्णुत्यासीकरोनीहर्षीत ॥ म्हणेम्यांमारिलावली सुत ॥ धारासुरदैत्यहा ॥३॥

आतांनिर्भयतुम्हींआपुलें ॥ राज्यकरावेंपूर्ववतचांगलें ॥ अंबेसहितमजरुचलें ॥ राहावयासीहेंस्थळ ॥४॥

तरीतुम्हीआपुल्यानामेंतीर्थें ॥ येथेंनिर्मावेंसमस्तें ॥ इतकेबोलूनीसुरगणातें ॥ विष्णुतेथेंचराहिला ॥५॥

जगदंबेच्याआज्ञेंकरुन ॥ स्थितझालादेवतगण ॥ यास्तवतेंस्थळपुण्यवान ॥ श्रेष्ठझालेंअतिशय ॥६॥

आतांतुम्हासी ॥ तीर्थमहिमा ॥ सांगतोंमीऋषीसत्तमा ॥ भोगावतीस्नानज्यानरोत्तमा ॥ माघमासींघडलेंदिनत्रय ॥७॥

त्यासीपुनरावृत्तिरहित ॥ विष्णुसाजुज्यहोतसेप्राप्त ॥ तीर्थेंबहुतत्र्यैलोक्यांत ॥ परिभागावतीसमाननसती ॥८॥

भोगावतीतटींश्राद्ध ॥ करितीश्रद्धापूर्वकशुद्ध ॥ तेपितरासहिताआपणप्रसिद्ध ॥ ऊर्ध्वलोकासीनेतसे ॥९॥

भोगावतीचेंस्नानपान ॥ वैशाखकार्तिकमाघस्नान ॥ करितीत्यांसीप्राप्तवैकुठभुवन ॥ ब्रह्मादिनपर्यंतहोतसे ॥१०॥

विष्णुसहितवैकुंठीराहे ॥ विष्णुगणाचेंअधिपत्यलाहे ॥ ऐसाभोगावतीचामहिमापाहे ॥ तुम्हांलागींवर्णिला ॥११॥

आतांनागतीर्थाचामहिमा ॥ श्रवणकराद्विजोत्तमा ॥ श्रावणशुद्धपंचमीसीनरोत्तमा ॥ तीर्थस्नानघडलेंज्या ॥१२॥

त्यांनीयथाशक्तिकरुन ॥ नगेशाचेंकरावेंपुजन ॥ ब्राह्मणसुवासिनी भोजन ॥ पायसादिपक्कान्नेघालावीं ॥१३॥

अक्षतापुष्पेंविल्वेंकरुन ॥ जोनागेशाचेंकरीलपुजन ॥ त्या मानवासीनागापासुन ॥ भयकदांनहोयभुलोकीं ॥१४॥

शिवरात्रीसीनिराहारकरुन ॥ दृढभक्तिजितेंद्रिय होऊन ॥ नागातीर्थजलानेंअभिषेककरुन ॥ जागरदीपदानकरितीजे ॥१५॥

तेशिवसायुज्यासीप्राप्तहोती ॥ केव्हांहीतेथेंदीपलाविती ॥ घंटावाजवृनीशिवदर्शनघेती ॥ तेजातीशिवमंदिरा ॥१६॥

तेशिवसायुज्यासीप्राप्तहोती ॥ केव्हांहीतेथेंदीपलाविती ॥ घंटावाजवुनीशिवदर्शनघेती ॥ तेजातीशिवमंदिरा ॥१६॥

आतांद्वारतीर्थाचामहिमा ॥ तुम्हीऐकामुनीसत्तमा ॥ जेव्हांधारासुरदैत्योत्तमा ॥ वधिलेमहाविष्णुनें ॥१७॥

जेथेंदेहपतनहोऊन ॥ विष्णुसायुज्यासीपावलाजाण ॥ तेथेंद्वारतीर्थझालेंनिर्माण ॥ सर्वलोकांसीपावनजें ॥१८॥

द्वारतीर्थजलस्पशेकरुन ॥ स्वर्गद्वारासीपावतीजाण ॥ द्वारतीर्थाचेम्स्नानकरुन ॥ पितारासीयजितीयथाविधी ॥१९॥

त्याचेपितरसमस्त ॥ स्वर्गीपुज्यप्रतिष्ठित ॥ होऊनीराहतीनेमस्त ॥ अक्षयसुखहोऊनी ॥२०॥

नगरासीद्वारगृहासीद्वार ॥ प्रवेशार्थकरितीनर ॥ तैसेंस्वर्गासीजावयाद्वार ॥ यांतसंशयनकारावा ॥२२॥

लक्ष्मीतीर्थेंजलातस्नान ॥ अष्ठमीसीसुर्योदयींयेऊन ॥ भृगुवारींमंदवारींकरितीजाण ॥ त्यासीलक्ष्मीसदाभजे ॥२३॥

जैसाविष्णुलक्ष्मीनाथ ॥ त्र्यैलोक्यांताअहेविख्यात ॥ तैसानरहीहोयाविख्यात ॥ लक्ष्मीतीर्थेंस्नानानें ॥२४॥

लक्ष्मीतीर्थाच्यातीरासी ॥ यथारुचीवायनब्राह्मणांसी ॥ तैसेंचद्यावेंसुवासिनीसी ॥ त्यासीलक्ष्मीप्राप्तीफलहोय ॥२५॥

लक्ष्मीतीर्थाहुनीश्रेष्ठैतरा ॥ नाहींझालेंनाहींहोणार ॥ ज्याचामहिमाब्रह्माहर ॥ मीस्कंदहीवर्णूनशकेची ॥२६॥

जेथेंभगवानपुरुषोत्तमा ॥ भक्तवत्सलदेवोत्तम ॥ शंकरासहितराहिलापरम ॥ लोकानुग्रहकारावया ॥२७॥

ज्याच्यादर्शनमात्रेंकरुन ॥ विष्णुलोकासीजातीमानवजन ॥ एकादशीनिराहारकरुन ॥ रात्रींजागरकरावा ॥२८॥

त्र्यैलोक्यपूज्यविष्णुचेंपुजन ॥ अनेक उपचारसमर्पुन ॥ तुळसीपुष्पधुपदेप अर्पून ॥ नानविधनैवेद्यसमर्पावा ॥२९॥

तांबुलचदंनादिउपचार ॥ विष्णुसीअर्पितीजेनर ॥ धन्यतेयालोकींथोर ॥ विष्णुभक्तदृढव्रत ॥३०॥

तेविष्णुलोकींविष्णुसहित ॥ आनंदभोगतीअपरिमित ॥ तेथेंचलीनहोतीनिश्चित ॥ पुतरागमनत्यानाहीं ॥३१॥

येथेंपुराणोक्तव्यासवचन ॥ याअध्यायींश्लोकलिहितोतीन ॥ कोणतेम्हणालविचक्षण ॥ तरीतेहतीसापासुनीपस्तीस ॥३२॥

॥ श्लोक ॥ सयवधन्योलोकोस्मिन्विष्णुभक्तोयतव्रतः ॥ विष्णुनामोदतेनाकेपुनस्तत्रैवलीयते ॥१॥३३॥

सकृदृर्शनमात्रेणदवेदवेस्यचक्रिणः ॥ यातितन्मयतांमर्त्योयथाद्वारतीस्थले ॥२॥३४॥

यनासौविदितो देवोवासुदेवोमहायशाः ॥ नचतीर्थाटनंतेनकर्तव्यंब्रह्मशासनात ॥३॥३५॥

जोविष्णुभक्तदृढव्रत ॥ नवविधभक्तिआचरत ॥ संकटीनेमासीनटळत ॥ यतव्रतत्यासीम्हणावें ॥३३॥

विष्णुमूर्तीचेंध्यान ॥ तेणेगेंलेदेहात्मभान ॥ ध्येयविष्णुध्याताआपण ॥ बुद्धिस्थचिदाभासस्वरुप ॥३४॥

ध्यातियासीध्येयाचेअनुसंधानें ॥ उठतीसात्विकभावलक्षणें ॥ प्रेमरोमांचादिचिन्हें ॥ सुखचप्रगटेबहु ॥३५॥

नाकम्हणजेदुःखरहित ॥ मोदतेंम्हणजेआनंदयुक्त ॥ ध्यातेपणासोडुनलीनचित्त ॥ ध्येयमात्राआपनहोतसे ॥३६॥

जोदेवमायाचक्रचाळक ॥ देवादिदेवब्रह्मांडनायक ॥ एकवारदर्शनेंतन्मयदेख ॥ द्वैतभावरहित होतसे ॥३७॥

जैसेंद्वारावतीस्थलींजन ॥ हेंएकयेथेंउपलक्षण ॥ गोकूळमथुरावृंदावन ॥ तेथीचेंजनमन्मयजैसे ॥३८॥

गोपगोपीउद्धवदिभक्त ॥ रुक्मिणीआदिस्त्रियासमस्त ॥ तेदेहासीविसरोनी अनुरक्त ॥ तन्मयझालेज्यापरी ॥३९॥

तेव्हांप्रत्यक्षहोताभगवंत ॥ आतांआम्हांसीझालागुप्त ॥ ऐसाविकल्पमनांत ॥ धरुंनयेसर्वथा ॥४०॥

प्रतिक ॥ येनासौय्विदितोदेवः ॥ टीका ॥ ज्यांनेंस्वधर्मानुष्ठानेंकरुन ॥ ईश्वराचेंकरुनीआराधना ॥ नवविधभक्तिपंथेंचालुन ॥ शरणजाउनीसदगुरुसी ॥४१॥

असौम्हणजेहाहृदस्थ ॥ बुद्धयादिकासीप्रकासीत ॥ देवतोगुरुकृपेनेंकेलाविदित ॥ अवस्थासाक्षीप्रत्यगात्प्रा ॥४२॥

प्रतिक ॥ वासुदेवोमहायशाः ॥ टीका ॥ एकादेहींविदितझाला ॥ तैसा सर्वत्रपाहिजेसमजला ॥ सर्वभूतांतव्यापुन उरला ॥ वासुदेवत्यासीम्हणावें \॥४३॥

वासुदेवसर्वमिती ॥ ऐसीश्रृतिस्मृतिपुराणेंगर्जती ॥ अनुभवघेवोनीऐसेंचगाती ॥ साधुसंतसर्वदा ॥४४॥

जोहृदयस्थतोचवसुदेव ॥ वासुदेवतोचहृदयास्थदेवस ॥ महायशाम्हणजेकितीगौरव ॥ वेदांतलोकांतप्रसिद्ध ॥४५॥

ऐसाज्यासीझालाविदित ॥ त्यांनीएकांतींभजावाभगवंत ॥ जाऊनयेतीर्थाटनकरीत ॥ ब्रह्मावचनाऐसेंअसें ॥४६॥

जेवहिर्मुख अज्ञान ॥ त्यांनीकरावेंतीर्थाटन ॥ तेणेंनिष्पापहोऊन ॥ पुण्यजोडेसत्संग ॥४७॥

क्रमानेंवैराग्यज्ञानभक्ति ॥ तेणेंत्यासहोयसद्गती ॥ ज्ञानझालियापुढती ॥ तीर्थाटनीभ्रमूनये ॥४८॥

बहुहिंडतांहोतीकष्ट ॥ मगतोनहोयध्याननिष्ठ ॥ बहिर्मुखासीतीर्थाटनश्रेष्ठ ॥ तेंचस्पष्टाऐकावें ॥४९॥

लक्ष्मीतीर्थींएकादशीसीस्नान ॥ जितेंद्रियेकरावेंविष्णुपुजन ॥ सर्व उपचार समर्पुन ॥ रात्रींजागरकरावा ॥५०॥

पारणेकरावेंद्वादशीस ॥ ऐसाजोनरद्वादशमास ॥ व्रतकरीलत्यासीवैकुंठवास ॥ पुत्रभायेंसहितहोईल ॥५१॥

हेंभ्यांसंक्षेंपेंकेलेंवर्णन ॥ पुढेंऋणमोचनतीर्थमहिमान ॥ सांगेनतेंकरावेंश्रवण ॥ स्कंदम्हणतसेऋषीसी ॥५२॥

पांडुरंगजनार्दन ॥ म्हणेश्रोतयालागुन ॥ कथा ऐकावयाजाण ॥ सावध अवश्याअसावें ॥५३॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडें ॥ तुरजामहात्म्यें ॥ शंकरवरिष्टसंवादे ॥ तीर्थमहिमावर्णननाम ॥ चतुत्रिंशोध्यायः ॥३४॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥