श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय ३५

श्रीगणेशायनमः ॥ जयत्रिपुरसुंदरीअंबिके ॥ दीनजडजीवप्रीतपाळके ॥ ब्रह्मदिदेवांसत्वाकौतुकें ॥ ऐश्वर्यदिधलेंउत्कृष्ट ॥१॥

स्कंदम्हणेतीर्थम्हणामोचन ॥ ज्याच्यास्नानेंपानेंजन ॥ मुक्तात्रिविधम्हणांतुन ॥ होतीसत्वरनिश्चयें ॥२॥

एकदामांडव्यमुनीश्रेष्ठ ॥ तपकरिताझालाउत्कृष्ट ॥ भुमिखणोनीनिर्मिलेंवरिष्ठ ॥ तीर्थएकतेवेळीं ॥३॥

कालद्वयस्नानकरुन ॥ देवपितरांचेंकरीयजन ॥ मुक्तझालाऋणबंधनापासुन ॥ म्हणोनीऋणमोचन नामझालें ॥४॥

भौमवारींयातीर्थींस्नान ॥ स्वकीयपितरांचेंकरुनीअर्चन ॥ स्वशक्तिनेंश्राद्धकरितीजाण ॥ तेअनऋणीहोतीभुलोंकी ॥५॥

ज्यातीर्थाचेंदर्शनस्नानपान ॥ करितांऋणमुक्तहोतीजन ॥ ऐसेंतीर्थपावन ॥ निःसंशयजाणिजे ॥६॥

आतांपापमोचनतीर्थ ॥ शंकरेंनिर्मिलेंलोकहितार्थ ॥ ज्याच्यादर्शनमात्रेंसमस्त ॥ पातकापासुनीमुक्तहोती ॥७॥

जैसेंगंगाजळींकरितांस्नान ॥ पवित्रहोयनलगतांक्षण ॥ तैसेंयातीर्थीकरितांस्नान ॥ निष्पापहोयतात्काळ ॥८॥

आतांनृसिंव्हतीर्थ उत्तम ॥ करिताझालापुरुषोत्तम ॥ तेथेंस्नानपानकरितांपरम ॥ ब्रह्माप्राप्तीचाहोयाधिकारी ॥९॥

एकादशीमंदवारीं ॥ जेस्नानकरितीतीर्थावरी ॥ भावेम्पुजितीनरहरी ॥ तेवैकुंठीसुखीराहती ॥१०॥

नृसिंहतीर्थतीरींजाण ॥ जेनरकरितीश्राद्धयज्ञ ॥ तेआपणांसहितसर्वपितृगण ॥ तारुनीजातसेस्वर्गासी ॥११॥

दुसरेंपापनाशनतीर्थ ॥ इद्रानेनिरिमिलेंयथार्थ ॥ स्नानमात्रेंजळतीसमस्त ॥ ब्रह्माहत्यादिपातकें ॥१२॥

पापनाशनतीर्थ ॥ स्नाजोनरकरीपांचदिन ॥ त्याचींपातकेंजळती संपूर्ण ॥ इंद्रलोकांसीजायतो ॥१३॥

तेथेंचसूर्यकुंडतीर्थ ॥ तेथेंचंद्रसूर्यग्रहणव्यतिपात ॥ भानुवार भृगुवरसंक्रात ॥ पर्वकाळींस्नानकरीलजो ॥१४॥

तोसर्वरोगापोआसनहोयमुक्त ॥ अतिसुर्यलोकाप्रतिजात ॥ अश्विनीमासींभानुवारीतेथ ॥ प्रातःस्नानकरुनियां ॥१५॥

कृरुनियांसुर्यपूजन ॥ सुर्यासींकरावेंअर्ध्यदान ॥ सूर्यमंत्र उच्चारुन ॥ नमस्कारघालावें ॥१६॥

॥ श्लोक ॥ नमासवित्रेत्रिगुणत्मनेनगः ॥ पद्मप्रबोधायसहस्त्ररश्म्य ॥ कालात्मेनर्गलयादिहेतवे ॥ तस्मैनमः कश्यपनंदनाय ॥१॥

ओवी ॥ यामंत्रानेंअर्ध्यदान ॥ सुर्योदिनामेंनमस्कारजाण ॥ करीलतोव्याधिनिर्मुक्तहोऊन ॥ सुखभोगभोगीलयेथेष्ट ॥१७॥

अंतीतेजोरुपहोऊन ॥ सुयलोकींराहेजाण ॥ सुर्यकुंदाचेमहात्म्यपूर्ण ॥ तुम्हांलागीकथिलेम्यां ॥१८॥

आतांसिद्धेश्वराचामहिमा ॥ तुम्हींऐकाद्विजोत्तमा ॥ जेव्हांविष्णूनेंदैत्योत्तमा ॥ मारिलेंसुदर्शनचक्रानें ॥१९॥

तेव्हासर्वहीसिद्धिघेऊन ॥ सुस्थितझालावृषभवाहन ॥ कैलासनाथउमारमण ॥ सिद्धेश्वरनामपावला ॥२०॥

भौमवारींसिद्धेश्वरपुजन ॥ करावेंकुसुमाक्षताअर्पून ॥ विल्वधत्तुरकुसुमादिकरुन ॥ नानाविधपुष्पेंसमर्पावें ॥२१॥

दध्योदननैवेद्याअर्पून ॥ जोमानवपुजाकरीलपूर्ण ॥ तोशिवाचागणहोऊन ॥ शिवसंनिधसुखीराहे ॥२२॥

जोनरशिवाएंकरीदर्शन ॥ त्यासीसिद्धीवशहोतीसंपुर्ण ॥ सिद्धेश्वराचामहिमावर्णन ॥ करावयाशक्यनोहें ॥२३॥

आतांऐकामुनीसत्तमा ॥ चक्रतीर्थाचामहिमा ॥ धरणीसीचक्रमारुनी उत्तमा ॥ उदकासीआणिलेंभगवंते ॥२४॥

तेंतीर्थसर्वलोकपावन ॥ झालेंचक्रतीर्थनामाभिधान ॥ ज्याचेजलस्पशेंकरुन ॥ विघ्नापासुनीनरमुक्तहोती ॥२५॥

त्यातीर्थीस्नानदानश्राद्धजोनर ॥ श्रद्धायुक्ताकरीलसाचार ॥ त्यासीप्रयागद्वारकापुर ॥ प्राप्तहोईल अनायासें ॥२६॥

एकमासपर्यतकरितांसेवन ॥ इतरतीर्थेम्पलदेतीपूर्ण ॥ तैसेंनोव्हेंचक्रतीर्थजाण ॥ वैकुंठदायकस्नानमात्रें ॥२७॥

स्नानकरुनीजायदुरित ॥ दर्शनमात्रेंहोयमुक्त ॥ पानकेलियास्वर्गप्राप्त ॥ तिन्हीसेवितापावेविष्णुलोक ॥२८॥

चक्रतीर्थाचेंमहात्म्य ॥ वर्णावयानोहेशक्य ॥ ब्रह्माहरीहरामलासामर्थ्ये ॥ संपूर्णवर्नावयानसे ॥२९॥

तीर्थमहात्म्ययथामती ॥ वर्णनकेलेंतुम्हांप्रती ॥ कपिलमुनीच्यायाप्रती ॥ आतांयेथूनसांगेनमी ॥३०॥

तुम्हींसावधहोऊनीचित्तीं ॥ श्रवणकराकथेप्रती ॥ स्कंदस्वयेंऋषीगणाप्रती ॥ बोलताझालाआदरें ॥३१॥

म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ तुम्हीश्रोतेभाविकजन ॥ श्रद्धापूर्वककरावश्रवण ॥ प्रार्थनाकरितोंमीतुमची ॥३२॥

इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रीखंडेतुरजामहात्म्येशंकरवरिष्ठसंवादे ॥ तीर्थमहिमावर्णनंनाम ॥ पंचत्रिशोध्यायः ॥३५॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥