श्री साई आरती

श्री साई बाबा आरती संग्रह


काकड आरती 1

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।  परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। 1 ।।
 
असो नसो भाव आलों तूझिया ठाया ।  कृपादृष्टीं पाहें मजकडे सदगुरुराया ।। 2 ।।

अखंडित असावें ऐसें वाटतें पायी ।  सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।।

तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।  नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ।। 4 ।।