श्री साई आरती

श्री साई बाबा आरती संग्रह


भूपाळी 1

उठा पांडुरंगा आतां प्रभातसमयो पातला ।  वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ।। 1 ।।

गरुडपारापासुनी महाद्घारापर्यंत ।  सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात ।। 2 ।।

शुकसनकादिक नारद-तुबंर भक्तांच्या कोटी ।  त्रिशूल डमरु घेउनि उभा गिरिजेचा पती ।। 3 ।।

कलीयुगींचा बक्त नामा उभा कीर्तनीं ।  पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी ।। 4 ।।