श्री साई आरती

श्री साई बाबा आरती संग्रह


भूपाळी 2

उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा ।  आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।। ध्रु0 ।।

गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया ।  परि ही अज्ञानासी तुमची भलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया ।  तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ।। चा0 ।।

भो साइनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी ।  अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ।। चा0 ।।

सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ।। आधि0 ।। उठा0 ।। 1 ।।

बक्त मनीं सद्घाव धरुनि जे तुम्हां अनुसरले ।  ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्घारि उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें ।  परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें ।। चा ।।

उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता ।  पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साइनाथा ।। चा0 ।।

आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितों देवा ।  सहन करिशिल तें ऐकुनि घावी भेट कृष्ण धांवा ।। उठा उठा0 ।। आधिव्याधि0 ।। 2 ।।