श्री साई आरती

श्री साई बाबा आरती संग्रह


कांकंड आरती 2

कांकडआरती करीतों साईनाथ देवा ।  चिनमयरुप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ।। ध्रु0 ।।

काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।  वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजवीला ।
साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।  तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।
द्घेत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरुपीं जीवा ।। चि0 ।। 1 ।।

भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहरसी ।  तोचि दत्तदेव तू शिरड़ी राहुनी पावसी ।
राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी ।  निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। चि0 ।। 2 ।।

त्वघशदुंदुभीनें सारें अंबर हेंकोंदलें ।  सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनि त्वद्घचनामृत अमुचे देहभान हरपलें ।  सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनियां साईमाउले दास पदरिं ध्यावा ।। चि0 ।। कां0 चि0 ।। 3 ।।