उठा साधुसंत साधा आपुलालें हित । जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ।। 1 ।।
उठोनियां पहांटे बाबा उभा असे विटे । चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टि अवलोका ।। 2 ।।
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राइळासी । जळतिल पातकांच्या राशी कांकंडआरती देखिलिया ।। 3 ।।
जागें करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत । वेंगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। 4 ।।
दारीं वाजंत्रीं वाजती ढोल दमामे गर्जती । होते कांकडआरती माइया सदगरुरायांची ।। 5 ।।
सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्घारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। 6 ।।