जय देव जय देव दत्ता अवधूता । साई अवधूता ।
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा । जय देव जय देव ।। धु ।।
अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी । नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं । हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।। ज0 ।। 1 ।।
यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें । संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें । मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियल ।। ज0 ।। 2 ।।
भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं । दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही । दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।। ज0 ।। 3 ।।
देवा साईनाथ त्वत्पदनत व्हावें । परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें । देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।। ज0 ।। 4 ।।