श्री साई बाबा भजन, अभंग

श्री साई बाबा भजन, अभंग


अभंग 3

शिर्डी माझे पंढरपुर । साईबाबा रमावर ।। १ ।।
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ।। २ ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ।। ४ ।।