इच्छापूर्ती शाबरी मंत्र

इच्छापूर्ती शाबरी मंत्रांच्या एक लाखांहून अधिक ओव्या नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचल्या आहेत. हे कुठेही लिखीत स्वरूपातील साहित्य नाही. गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत. हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत. ह्या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघता येतो. बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांत सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ शाबरी मंत्र नाहीत. बाजारातील पुस्तकांत जे मंत्र दिले जातात ते वास्तविक बर्भरी मंत्र आहेत. मुळ शाबरी मंत्राची बिजं या मंत्रामध्ये रोवून बर्भरी मंत्र बनवले गेले असावेत.


प्रेमप्राप्ती

त्वरित प्रेमसाठी

हा मंत्र  स्वयं सिद्धी आहे.  बऱ्याच लोकांच्या अनुभवातून सांगितलं गेला आहे. ह्या मंत्राचे अनुष्ठान करताना एक शुभ दिवस ठरवावा. या मंत्राचा जाप १०८ वेळा करावा. असे एकोणीस किंवा एकवीस दिवस करावे. हे अनुथं करत असताना नारळ, लिंबू, अगरबत्ती, गूळ, याचा प्रसाद नवनाथांना अर्पण करावा. 

ॐ ह्रीं क्लीं श्रीं वाराह-दन्ताय भैरवाय नमः।

मंत्र कसा म्हणावा??

  • जपाची वेळ आणि जागा बदलू नये. 
  • एका जपमाळेत  १०८ वेळा अशी १०८ आवर्तने करावी.
  • अभक्ष भक्षण टाळावे. म्हणजेच अंडी, चिकन, मटण, मासे व इतर कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ सेवन करू   नयेत.

टीप: पूर्ती झाल्यावरती नवनाथांच्या समाधी स्थळांना देणगी द्यावी आणि अन्नदान करावे.