जोधपूरमध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धापासून किमान ७००-कि.मी.च्या परिघामध्ये असलेल्या काही शहरात किरणोत्सर्गाचे अनेक पुरावे सापडतील.
ब्रम्हास्त्र जे अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भाकडे सोडले होते ते अर्जुनाने निकामी केले. परंतु निकामी करण्याच्या प्रक्रियेने इतका मोठा स्फोट घडला कि आजूबाजूच्या परिसरात त्याचे पडसाद उमटले. आज असे मिथक आहे कि जोधापूर जवळच्या परिसरात कुरुक्षेत्रात वापरल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रांचा इतका परिणाम झाला आहे कि, जन्माला येणारी अर्भके अधू किंवा व्यंग असलेली जन्माला येतात.
महाभारताला खराखुरा इतिहास मिळावा यासाठी आता हे खूप संशोधन चालू आहे. महाभारताच्या सत्यता पडताळण्यासाठी खूप तर्क लावले जात आहेत.