नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री चिंतामणी, कळंब, यवतमाळ

श्रीमद् मुदगल पुराणात ह्या गानेह्स्च्या स्थानिर्मितीचा संदर्भ आहे. ह्या गणेशाची मूर्ती उत्तम शिल्पकलेचे उदाहरण आहे.

हे गणेशस्थान जमिनीपासून सुमारे ३५ फुट खोल आहे. दगडी पायर्यांनी खाली उतरल्यावर  मोठे गणेशकुंड आहे.

जमिनीवरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. १२-१३ वर्षांनी गणेशकुंडातून गंगा अवतरते असे समजले जाते.

रेल्वेने जायचे झाले तर मुंबई ते नागपूर सुमारे ८०० कि.मी. आहे. यवतमाळ नागपूरहून ५० कि.मी आहे.

राज्य महामार्ग 7 ए यावर हे मंदिर आहे.