केळघर या शहराचे जुने नाव एकचक्रीनगरी आहे. या छोट्या गावात एका टेकडीवर हे गणेशस्थान आहे.
पांडवकाळी बकासुर वधानंतर पांडवांनी हे गणेश मंदिर स्थापिले आहे असा गावकऱ्यांचा समज आहे.
ही गणेशाची मूर्ती चार फुट उंच आहे. मंदिर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. हे ठिकाण
मुंबई वरून रेल्वेने जायचे झाल्यास नागपूर ते मुंबई ८३० कि.मी. आहे. नागपूर ते यवतमाळ या रस्त्यावर केळघर हे गाव आहे.
ते नागपूर रेल्वेस्टेशन पासून ५२ कि.मी वर आहे.