नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


आवळी वरील गणपती पावस

पावसच्या स्वामी स्वरुपानंदांच्या समाधीजवळ आवळ्याच्या झाडांवर एक गणेशस्थान आहे.

निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल असे हे गणेशस्थान आवळी वरील गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.

येथील आवळीच्या झाडांवर मोठाल्या फांद्यांच्या बेचक्या नी नैसर्गिकरीत्या गाठी तयार झाल्या आहेत

त्याचा आकार गणेशा सारखा असून नित्य नव्या गाठी बनतच असतात.