नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री आशापूरक सिद्धिविनायक महागणपती, केळशी, ता. दापोली, रत्नागिरी.

केळशी बस स्थानकाजवळच गावात परांजपे आळीतील निसर्गरम्य वातावरणातील हे गणेशस्थान आहे.

हे गणेशाचे स्वरूप भक्तांच्या आशा इच्छा आकांक्षा पुरवणारे असल्याने त्याला तसे नाव दिले गेले आहे.

बिवलकरांचा हे पुरातन भक्कम दगडी कोट बांधणीचं मंदिर आहे.

या मंदिराच्या बाहेर केळशी येथील सत्पुरुष गणेशभक्त श्रीगणेश लिमये यांची समाधी आहे

 तिथे त्यांच्या अस्थी आणि पादुका आहेत.

आशापूरक सिद्धिविनायक महागणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी मुंबई ते दापोली अशी बससेवा उपलब्ध आहे.