भगवान श्रीविष्णु अवतारी व एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणार्या महापराक्रमी परशुरामाचे हे स्थान आहे.
सुमारे सहाशे वर्षांपूर्वी या स्थानाचा शोध लागला येथे गणपतीसोबत दक्षिणाभिमुख मारुती रेणुका माता गावदेवी इत्यादी मंदिरदेखील आहे
श्रीगणेशाची आराधना व परशु विद्या प्राप्तीसाठी भार्गवराम म्हणजेच परशुराम कैलासावर गेले हाेते.
अत्यंत पुरातन असे हे दगडी बांधणीचे मंदिर आहे.
मुंबई-गोवा रस्त्यावर खेड व चिपळूण दरम्यान परशुराम फाटा लागतो.
तेथून सुमारे दोन किलोमीटर पायी चालल्यावर परशुरामाचे मंदिर येते.
आता घाटातून मंदिरापर्यंत गाडीही जाते.