नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री सिद्धिविनायक प्रभादेवी मुंबई

मुंबईतील अनेक श्रद्धास्थानांपैकी भक्तांनी नेहमी गजबजलेल्या असणारे हे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर म्हणजे एक प्रसिध्द गणेशस्थान आहे.

या मंदिराचा प्रसिध्दी काळ अगदी अलीकडचाच आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे या स्थानास आशीर्वाद लाभले आहेत

रामकृष्ण जांभेकर महाराज यांनी स्वामी समर्थांच्या आदेशावरुन या स्थानावर  सिद्धी पुरल्या होत्या.

पूर्वीची मूळ मूर्ती तशीच ठेवून सहा मजली बहुकोनी जीर्णोद्धारित इमारत त्यावर बांधली गेली आहे.

मधोमध त्यावर कळसही आहे दादर वा परळ येथून  बेस्टच्या बऱ्याच सेवा सिद्धीविनायकासाठी उपलब्ध आहेत.

येथे दादर वा परळहून पायीदेखील येता येते.