नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री वाच्छा सिद्धिविनायक अंधेरी पूर्व

मुंबईमधील अंधेरी पूर्व येथे एम.वी. रोडवरील स्टेशनजवळ हे गणेशस्थान आहे.

१९२७ साली मंदिराची स्थापना झाली. हे श्रद्धास्थान अत्यंत जागृत असे समजले गेले आहे

पूर्व पश्चिम आकारातील पूर्व दगडी मंदिर आहे.

मंदिराचा कळस चार मजल्यांच्या इतक्या उंचीपर्यंत जाऊ शकतो इतका मोठा आहे.

या मंदिरात गणेशाची पांढरीशुभ्र दोन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे.

या गणेश मूर्तीच्या मागे लाकडी मखर आहे व परिसरात दत्त आणि शंकराचे मंदिरही आहे.