नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री बल्लाळ सिद्धिविनायक नागाव अलिबाग

नागाव येथे १८४७ साली श्री आठवले यांच्या हस्ते या या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीस एकवीस साली झाला ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत नामसप्ताह असतो.

मुरुड, नांदगाव, अलिबाग, आवास, आक्षी, किहीम, रेवस आदी ठिकाणांहून नागाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

ही गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असुन संगमरवरी चौथऱ्यावर बैठक असलेली आहे.

मुंबईवरून रेवससाठी लाँचेस मिळतात तिथून नागावला एसटीने दीड तास लागतो.

हे मंदिर म्हणजे समुद्रतळाशी रमणीय सुरुची आणि नारळाचे बने यांची पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण आहे.