नवसाला पावणारे गणपती- भाग १

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री दशभूज वल्लभेश गणपती बुधवार पेठ पुणे

पेशवेकालीन सरसेनापती हरिपंत फडके यांच्या पडक्या वाड्यातील हा गणपती हेदवी च्या दशभुजा सिद्धी लक्ष्मी गणेशासारखा आहे.

हे खाजगी देवस्थान आहे.

याचा मूळपुरुष नागस्वरुपात येत असे व गणपतीवर फणा धरीत असे. फडके घराणे गणेश उपासक होते.

दशभुज वल्लभेश हे त्यांचे उपासना दैवत आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदा ते चतुर्थीपर्यंत घरातील पार्थिव मूर्तीचा उत्सव होतो.

चतुर्थीच्या पुढे पाच दिवस मृण्मयी गणपती आणून उत्सव करण्याची प्रथा आहे.

अशीही गणपतीची नवरात्र असते. १९१६ पर्यंत सारे कुलाचार उत्सव साजरे होत होते.

आता फक्त भाद्रपदातील चार दिवस उत्सव साध्या रीतीने साजरा होतो.