या गणपतीची गोष्ट अशी सांगितली जाते की शापदग्ध सूर्यपुत्र यमधर्माने गणरायाची आराधना करून हे मंदिर स्थापन केले.
या मंदिराला आशापूरक गणेश असे म्हणतात.
कर्पुरा बिंदुसरा व नारदा या तीन नद्यांच्या संगमावर हे गणेशस्थान स्थित आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख दगडी बांधणीचे आहे या मंदिराबाहेर भृशुंडी महाराजांचेही मंदिर आहे.
बीडहून नामलगाव बसच्या अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.