याठिकाणी अत्यंत क्रूर अशा लिंबा सुरांचा व गणपतीने केला होता.
त्या असुराच्या इच्छेनुसारच लिंबागणेश असे नाव ठेवण्यात आले होते.
याठिकाणी ब्रह्मा, विष्णु, महेश याशिवाय जगदंबा, सूर्य या पंचेश्वर आणि आपल्या मानस पूजेतील पाच मूर्ती गणेशाला पत्नी रूपाने अर्पण केल्या होत्या.
यामुळेच या गणपतीला पंच पत्नी गणेश असेही म्हणतात. हे गणेशाचे विवाहक्षेत्र मानले जाते.
ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मूर्तीची उंची दोन फुटाचे आहे आणि या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे.
परळी वैजनाथ या प्रसिध्द ज्योतिर्लिंगाजवळ हे गणेशाचं स्थान आहे.